शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

इचलकरंजी शहरामध्ये वाहतूक नियमन निर्देश जारी

 

 

कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : इचलकरंजी शहरामध्ये दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने तसेच ऊस वाहतूक करणारी वाहने यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने गंभीर व प्राणांतीक अपघात, वाहतूक कोंडी, शासकीय मालमत्तचे नुकसान होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ पोटकलम १(ब) अन्वये रहदारी विनीयमनाचे अधिकारान्वये पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी इचलकरंजी शहरातील वाहतूक नियोजनासाठी निर्देश जारी केले आहेत.

 शहरातील सिग्नल व्यवस्था पूर्वी बसविण्यात आलेले

 मलाबादे चौक (जनता चौक),  हवामहल बंगला चौक (प्रांत कार्यालय चौक), राजवाडा चौक (बंद स्थितीत आहे, जागा बदलणे आवश्यक)

 नवीन बसविलेले सिग्नल :-

  डेक्कन चौक

 प्रस्तावित सिग्नल :-

 थोरात चौक, महासत्ता चौक

 नवीन एकेरी मार्ग :

१) चांदणी चौक ते मरगुबाई मंदीरजवळचा डी पी असा एकेरी मार्ग व मरगुबाई मंदीरजवळचा डी पी ते चांदणी चौक येथून दुचाकी, तीन चाकी व हलकी चार चाकी वाहने वगळून इतर अवजड वाहने जाणेस बंदी  गुलाबकुंज चौक ते उत्तम प्रकाश टॉकीज चौक असा एकेरी मार्ग व उत्तम प्रकाश टॉकीज चौक ते गुलाबकुंज

चौक येथून दुचाकी, तीन चाकी व हलकी चार चाकी वाहने वगळून इतर अवजड वाहने जाणेस बंदी

 नवीन पी. 1-पी. २ समविषम तारखेप्रमाणे पार्किंग रोड

१) शाहू पुतळा चौक ते नवीन नगरपालीका

 नवीन नो-पार्किंग झोन

  रसना कॉर्नर ते झेंडा चौक, भगतसिंग गार्डनचे गेटसमोर लोखंडी ग्रीलसमोर तसेच भगतसिंग गार्डन ते थोरात चौक अवजड वाहनांना नो पार्कींग

 नो पार्कंग चौक-

 एएससी कॉलेज चौक, शाहू पुतळा चौक, यशवंत प्रोसेस चौक,  शिवाजी पुतळा चौक, गांधी पुतळा चौक,  राजवाडा चौक,  रसना कॉर्नर चौक,  मरगुबाई मंदीर चौक, उत्तम प्रकाश टॉकीज चौक,  संभाजी चौक,  तीन बत्ती चौक,  गुलाबकुंज चौक,  लिंबू चौक, नवीन नगरपालीका चौक, वर्धमान चौक,  राधाकृष्ण टॉकीज   चौक, थोरात चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, डेक्कन चौक, फॉर्चून प्लाझा चौक

  नवीन सायलन्स झोन

  सी. इ. टी. पी. चौक ते महासत्ता चौक, गोकुळ चौक ते आय जी एम दवाखाना, पद्मा पॉवर लाँड्री ते नामदेव भवन मैदान ते विनायक मार्केटींग ते धुत बिल्डींग

 अवजड वाहनांना प्रमुख मार्गावर बंदी :

 जुनी

१) छ. शिवाजी पुतळा ते मलाबादे चौक ते गांधी पुतळा ते नारायण चित्रमंदिर तसेच राजवाडा चौक - सकाळी ते ०९.०० ते १४.०० वा पर्यंत व दुपारी १६.०० ते २०.३० पर्यंत या वेळेत अवजड वाहनांस बंदी घालून इतर वेळी रात्रौ २०.३० ते सकाळी ०९.०० व दुपारी १४.०० ते १६.०० पर्यंत ये-जा करण्यास सवलत देण्यात यावी.

            या बंदी आदेशात खालीलप्रमाणे वाढ करण्यात येत आहे. अवजड वाहनांना प्रमुख मार्गावर बंदी -

१) इचलकरंजी शहरामध्ये मरगुबाई मंदीर ते गुलाबकुंज चौक ते लिंबू चौक ते चंदूर फाटा ते बंडगर माळ ते शाहू पुतळा ते शिवाजी पुतळा ते वखार भाग ते थोरात चौक ते महासत्ता चौक ते राजवाडा चौक ते रसना कॉर्नर चौक ते मरगुबाई मंदीर या मार्गे अवजड वाहनांची वाहतूक करता येणार आहे. या रिंगरोडवरुन शहरात आतमध्ये अवजड वाहनांना यामध्ये ३ टन वजन क्षमतेपेक्षा जास्त परवाना असलेले हलकी, जड व अवजड वाहने तसेच बसेसना सकाळी ९.०० ते रात्री २१.०० वा. चे दरम्यान बंदी करण्यात येत आहे (एस.टी. स्कूल बस, नगरपालिकेची वाहने व आपत्कालीन कालावधीत येणारी वाहने वगळून). अवजड वाहनांना रात्री २१.०० ते सकाळी ९.०० पर्यंत ये-जा करण्यास सवलत देण्यात येत आहे.

२) उस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर ट्रॉलीज, बैलगाडी यांना इचलकरंजी शहरामध्ये मरगुबाई मंदीर ते गुलाबकुंज चौक ते लिंबू चौक ते चंदूर फाटा ते बंडगर माळ ते शाहू पुतळा ते नवीन नगरपालीका पंचगंगा कारखाना यड्राव फाटा या मार्गे अवजड वाहनांची वाहतूक करता येईल. या रिंगरोडवरुन शहरात आतमध्ये येण्यास बंदी करण्यात येत आहे. यड्राव फाटा ते झेंडा चौक ते मरगुबाई मंदीर या मार्गे उस वाहतूक वाहनांना बंदी करण्यात येत आहे. टाकवडेकडून येणारी उसाची वाहने महासत्ता चौक ते थोरात चौक ते आंबेडकर पुतळा इंडस्ट्रीयल इस्टेट शाहू पुतळा बंडगर माळ ते लिंबू चौक ते मरगुबाई मंदीर अशी जातील.

३) ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना यामध्ये ट्रक, ट्रॅक्टर ट्रॉलीज, बैलगाडी यांनी ९.०० ते २१.०० वा चे दरम्यान कबनूर चौकात येणेसाठी चंदूर-रुईकडून, पंचगंगा साखर कारखान्याकडून, इचलकरंजी व कोल्हापूर रोडकडून बंदी करण्यात येते. तसेच पट्टणकोडोली इंगळी रुई येथील उसाची वाहने रुई फाटा कबनूर ओढा केटकाळे बोअरवेल मार्गे पंचगंगा कारखाण्यास जातील व या मार्गे परत येतील. यांना कबनूर चौकात येण्यास बंदी घालण्यात येते.

इचलकरंजी शहरातील आठवडा बाजार ठिकाणे

१) थोरात चौक :- शुक्रवार

इचलकरंजी शहरातील थोरात चौकातील आठवडा बाजार हा खवरे मार्केट येथील नियोजित जागी बसेल. थोरात चौकात व रस्त्यावर रहदारीस अडथळा होणार असे कोणताही विक्रेते, हातगाडे, किंवा रिक्षावाले इतर वाहने थांबणार नाहीत. बाजारात विक्रीसाठी येणारे विक्रेते यांनी आपले वाहन व बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनानी पाकींग खवरे मार्केटच्या उत्तर बाजूस रस्त्याच्या एका बाजूला करण्यात यावे.

२) उत्तम प्रकाश टॉकीज चौक मंगळवार व शुक्रवार बाजार

उत्तम प्रकाश टॉकीजजवळील आठवडा बाजार हा मार्केट येथील नियोजित जागी बसेल. रस्त्यावर रहदारीस अडथळा होणार असे कोणतेही विक्रेते, हातगाडे, किंवा रिक्षावाले इतर वाहने थांबणार नाहीत. बाजारात खरेदीसाठी येणाऱ्यांसाठी दुचाकी वाहनांचे पार्किंग मार्केटच्या उत्तर बाजूस असलेल्या पूर्व-पश्चिम रोडवर रहदारीस अडथळा होणार नाही अशा पद्धतीने रस्त्याच्या एका बाजूला पार्कींग करावयाची आहेत.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.