कोल्हापूर दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) :-
विरंगुळा केंद्रातून ज्येष्ठ नागरिकांना आपुलकीचा आधार सहजपणे मिळेल, यासाठी
जिल्ह्यातील प्रत्येक गावात, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्र
सुरु करावे. प्रत्येक नगरपालिकेने 15 नोव्हेंबरपर्यंत आपल्या कार्यक्षेत्रात दोन
विरंगुळा केंद्रे सुरु करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी
दिल्या.
जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी
कार्यालयात झाली. बैठकीस जिल्हा समाज कल्याण अधिकारी दिपक घाटे यांच्यासह संबंधित
विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.
रेखावार म्हणाले, विरंगुळा केंद्रामुळे
ज्येष्ठांना एकत्र येण्याचे व आपला वेळ
घालवण्याचे हक्काचे ठिकाण मिळेल.
जिल्ह्यातील प्रत्येक गावात अशी विरंगुळा केंद्रे कार्यान्वित करावीत. पहिल्या
टप्यात मोठ्या गावात विरंगुळा केंद्रे सुरु करण्यास प्राधान्य द्यावे. विरंगुळा
केंद्रासाठी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करुन द्यावी. ही विरंगुळा केंद्रे
अंगणवाडी, अनाथालय, बगिचा अशा ठिकाणी सुरु
करण्यास प्राधान्य द्यावे.
ज्येष्ठ
नागरिकांसाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ त्यांना सहजपणे मिळावा यासाठी शासकीय
यंत्रणांनी काम करावे. ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबतची
जनजागृती करावी. ज्येष्ठ नागरिकांकडे आधारकार्ड नसल्यास अशा ज्येष्ठ नागरिकांना
आधारकार्ड देण्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घ्यावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी
श्री. रेखावार यांनी दिल्या.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.