कोल्हापूर,
दि. 6 (जिमाका) : विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या शासन
निर्णयान्वये धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इयत्ता पहीलीपासून बारावीपर्यंत इंग्रजी
माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या शासन
निर्णयामधील अटी व शर्तीची पूर्तता करून या योजनेअंतर्गत काम करणा-या शाळांकडून
प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. हे प्रस्ताव दिनांक २९ ऑक्टोबरअखेर कार्यालयामध्ये
जमा करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले
आहे.
विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या शासन
निर्णयान्वये उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमांसाठी इंग्रजी माध्यमाचा वापर होत असल्यामुळे
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणात मागे पडू नये तसेच उच्च शिक्षणाच्या
बदलत्या परिस्थितीशी त्यांना जुळवून घेणे शक्य व्हावे, यासाठी धनगर समाजाच्या
विद्यार्थ्यांना शहरांतील इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत निवासी शाळांमध्ये शिक्षण
देण्यासाठी योजना सुरू केली आहे. अधिक माहीतीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण
कार्यालय, विचारे माळ, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.