गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०२१

बाल व किशोरवयीन कामगार कामावर ठेवल्यास कारवाई -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

 


 

कोल्हापूर, दि. 21 (जिमाका): जिल्हयामध्ये कोणत्याही व्यवसायात 14 वर्षाखालील बालकास व प्रतिबंधीत उद्योग व प्रक्रिया करणा-या संस्थामध्ये 15 ते 18 वर्षामधील किशोरवयीन कामगार कामावर ठेवण्यात येवू नये. बाल व किशोरवयीन कामगार कामास ठेवल्यास कारवाई करण्यात येईल, शा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.

       बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986 अंतर्गत जिल्हा बालकामगार कृतीदलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस शासकीय कृतीदल सदस्य तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

        जिल्ह्यामध्ये कोणत्याही व्यवसायात 14 वर्षाखालील बालकांस कामास ठेवू नये, तसेच शासन अधिसूचना दि. 30 जुलै 2016 अन्वये प्रतिबंधीत उद्योग व प्रक्रिया करणा-या संस्थामध्ये 14 वर्षाखालील बालक तसेच 15 ते 18 वर्षामधील किशोरवयीन कामगारांस कामावर ठेवण्यास कायद्याने मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या आस्थापनेमध्ये बालकास कामावर ठेवल्यास 6 महिने ते 2 वर्षे इतकी शिक्षा किंवा 20 ते 50 हजार रुपये इतका दंड किंवा शिक्षा आणि दंड दोन्हीही होऊ शकतो.

       प्रतिबंधीत उद्योग व प्रक्रिया करणा-या संस्थांमध्ये किशोरवयीन कामगारास कामास ठेवल्यास 6 महिने ते 2 वर्षे इतकी शिक्षा किंवा 20 ते 50 हजार रुपये दंड किंवा शिक्षा आणि दंड दोन्हीही होऊ शकतो.

       ज्या ठिकाणी बाल कामगार असल्याचे आढळून येल अशा आस्थापनेचा परवाना / नोंदणी रद्द होवू शकते. या आस्थापना ज्या इमारतीमध्ये सुरु आहे त्या इमारतीचा बांधकाम परवाना रद्द होऊ शकतो.  अधिनियमान्वये देखील गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीस वा संस्थेस कोणतेही शासकीय काम मिळणार नाही, तसेच संस्थेस वा उद्योगास जागा वा इमारत भाडेतत्वावर देण्या-या जागा मालक वा इमारत मालक यांना सहआरोपी करण्यात येवू शकते. तसेच अशा संस्थेचा दुकाने परवाना, कंत्राटी अनुज्ञप्ती रदद होऊ शकते.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.