कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय): कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज पासून सुरु झालेल्या ‘माझे कुटुंब
माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत 27 कुटुंब कल्याण केंद्राच्या माध्यमातून
केलेल्या सर्व्हेक्षणाच्या आजच्या दोन दिवसात 88120 घरांचे आणि 371123 इतक्या
लोकांची सर्व्हेक्षण करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश
साळे यांनी दिली.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेअंतर्गत दोन
दिवस तपासणी करण्यात आलेल्या तालुक्यातील नागरीकांची कुटुंब कल्याण केंद्र निहाय माहिती
आजरा-2044 घरांचे व 7707 नागरिकांचे.
भुदरगड 9768 घरांचे व 38351 नागरिकांचे, चंदगड 4431 घरांचे व 22497
नागरिकांचे, गडहिंग्लज 13225 घरांचे व 54248 नागरिकांचे, गगनबावडा 749 घरांचे व
371 नागरिकांचे, हातकणंगले 10237 घरांचे व 47737
नागरिकांचे, करवीर 5569 घरांचे व 18596 नागरिकांचे, पन्हाळा 4197 घरांचे व 21033 नागरिकांचे, राधानगरी 4807
घरांचे व 20322 नागरिकांचे, शाहूवाडी 2401
घरांचे व 10687 नागरिकांचे, तर शिरोळ- 3962 घरांचे व 22139 नागरिकांचे असे
एकूण 61390 घरांचे व 263688 नागरिकांचे
सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
नगरपंचायत
हातकणंगले 300 घरांचे व 1422 नागरिकांचे, नगरपंचायत इचलकरंजी 9255 घरांचे व 41489 नागरिकांचे, नगरपंचायत पेठवडगाव 130
घरांचे व 555 नागरिकांचे,तर नगरपंचायत पन्हाळा 140 घरांचे व 474 नागरिकांचे, असे
एकूण 9825 घरांचे व 43940 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. तर कोल्हापूर
शहरातील 16905 घरांचे तर 63495 नागरिकांचे
सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.