कोल्हापूर, दि. 2 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यातील आस्थापनांनी जास्तीत-जास्त रिक्तपदांची मागणी व बेरोजगार उमेदवारांनी आपली नोंदणी कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सं.कृ.माळी यांनी केले आहे.
अटी व शर्तीच्या आधारे सुरु झालेल्या औद्योगिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्य बळाची कमतरता भासत आहे. कोरोना जागतिक महामारीमुळे उमेदवार तसेच संपूर्ण जनतेला संचारबंदी असल्याने बेरोजगार रोजगार शोधासाठी बाहेर जाऊ शकत नाहीत. यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात 12 उद्योजकांनी सहभाग नोंदवला आहे. 246 रिक्तपदे आहेत. 537 बेरोजगार उमेदवारांनी दूरध्वनीद्वारे मुलाखती दिल्या व त्यापैकी 129 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली व प्रत्यक्ष 33 जणांची अंतिम निवड करण्यात आली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.