सोमवार, ९ जानेवारी, २०१२

टेंबलाई हिल येथील मोफत वैद्यकीय सेवेचा हजारोंना लाभ

        कोल्हापूर दि. ९ : भारतीय प्रादेशिक सेना १०९ इन्फैन्टी बटालियनच्यावतीने नुकत्याच आयोजित केलेल्या मोफत वैद्यकीय सेवेचा जिल्ह्यातील अकरा हजाराहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला असल्याची माहिती डॉ. रवि जाधव यांनी दिली.
        डॉ. रवि जाधव यांच्याकडून होणारी निःस्वार्थ देश सेवा आणि त्यांच्या यशस्वी वाटचालीबद्दल १०९ इन्फैन्ट्री बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विजय मनराल यांनी कौतुक केले. टेंबलाई हिल येथे दररोज सकाळी व सायंकाळी दोन तास होमिओपॅथी वैद्यकीय सेवा दिली जाते. गेल्या पाच वर्षापासून डॉ. रवि जाधव आणि जगतगुरु पंचचार्य एज्युकेशन सोसायटीचे होमिओथी कॉलेजचे शिकाऊ डॉक्टर्स ही सेवा पुरवित आहेत.
        या कार्यक्रमासाठी ले. कर्नल उमराव सिंग राठोड, मेजर प्रदिप सिंग पोखरिया, मेजर श्याम बिहारी सिंग, सुभेदार मेजर अर्जुन जनगोंडा, सुभेदार नामदेव जगताप व श्री जगतगुरु पंचचार्य एज्युकेशन सोसायटीचे शिकाऊ डॉक्टर्स उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.