शनिवार, २१ जानेवारी, २०१२

सैन्य सेवेदरम्यान मृत्यू पावलेल्या सैनिकांच्या अपंगत्व प्राप्त पाल्यांना चरितार्थ आर्थिक मदत

            कोल्हापूर दि. २१ : आर्मी ग्रुप इंश्युरन्स, ए. जी. आय. भवन, नवी दिल्ली यांनी २७ ऑक्टोबर २००७ नंतर सैन्य सेवे दरम्यान मृत्यू पावलेल्या सैनिकांच्या ४० टक्क्यापेक्षा जास्त अपंगत्व प्राप्त पाल्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार वेगवेगळ्या कारणास्तव ४० टक्के व त्याहून अधिक अपंगत्व प्राप्त दोन पाल्यांना चरितार्थ आर्थिक मदतीसाठी पात्र अशा पाल्यांची माहिती दि. २८ फेब्रुवारी २०१२ पर्यंत आर्मी ग्रुप इंश्युरन्स, ए. जी. आय. भवन, नवी दिल्ली यांना पाठवावयाची आहे.
           तरी जिल्ह्यातील २७ ऑक्टोबर २००७ नंतर सैन्य सेवा दरम्यान मृत्यू पावलेल्या सर्व माजी सैनिक अवलंबितांनी अपंगत्व प्राप्त पाल्यांचा अपंगत्व वैद्यकीय दाखला, डिसचार्ज पुस्तक व ओळखपत्राची छायांकित प्रत तसेच ग्रामसेवकाकडून पाल्यांचा फोटोसह दाखला तसेच सर्व सैनिकी कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कार्यालयीन वेळेत १५ फेब्रुवारी २०१२ पर्यंत संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.