शुक्रवार, १३ जानेवारी, २०१२

राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखण्याचे जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

        कोल्हापूर दि. १३ : येत्या २६ जानेवारी रोजी उत्साहात साजरा होणार्‍या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान आणि पावित्र्य राखले जाईल याची दक्षता सर्वांनी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
       जिल्हावासियांनी प्रजासत्ताक दिन साजरा करतांना राष्ट्रध्वजाचा पूर्ण सन्मान राखावा, ध्वज कुठेही फेकू नये, त्याचे विद्गुपीकरण होऊ नये, तसेच अन्य कुठल्याही प्रकारे ध्वजाचा अवमान होऊ नये याची दक्षता घ्यावी. राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखणे आपणां सर्वांचे राष्ट्रीय तसेच नैतिक कर्तव्य आहे याची जाणीवही यानिमित्ताने करुन दिली आहे. जाणीवपूर्वक जर राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रप्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१ कलम २ अनुसार कारवाई करण्यात येते असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कोल्हापूरवासिय राष्ट्रध्वजाचा पूर्ण सन्मान राखून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी आणि उत्साहाने साजरा करतील, असा विश्वासही जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.