कोल्हापूर दि. ११ : जानेवारी २०१२ मध्ये होणार्या कोल्हापूर महोत्सवांतर्गत कोल्हापूर जिल्हा पर्यटन स्थलदर्शन छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत कोणत्याही व्यक्तीस, छायाचित्रकारास सहभाग घेता येईल.
स्पर्धेसाठी विषय पुढीलप्रमाणे - १) ऐतिहासिक वास्तु, २) गडकिल्ले, ३) धार्मिक स्थळे, ४) अभयारण्ये, पशु, पक्षी, स्थाने, ५) निसर्ग स्थाने, ६) मंदिर, शिल्पे, पुतळे, ७) नद्या, तलाव (जलसंपदा), ८) वृक्षसंपत्ती आणि ९) हस्तकला.
स्पर्धेचे नियम - कोणाही व्यक्तीस वा छायाचित्रकारास भाग घेता येईल. छायाचित्राचा आकार १५ इंच बाय १८ इंच किंवा १२ इंच बाय १८ इंच एवढाच असावा. (माऊंट करु नये.) छायाचित्रासोबत छायाचित्राची ३०० शब्दात माहिती संगणकीय लिपित देणे आवश्यक आहे. छायाचित्राबरोबर ४ इंच बाय ६ इंच एक प्रत त्यामागे नांव, पत्ता, दूरध्वनी क्रमांकासह द्यावी. स्पर्धेत निवड झालेली छायाचित्रे परत केली जाणार नाहीत. एका व्यक्तीस जास्तीत जास्त तीनच छायाचित्रे पाठविता येतील. परीक्षण समितीचा निर्णय अंतीम व बंधनकारक राहील. छायाचित्र पाठविण्याचा अंतिम दि. १७ जानेवारी २०१२ आहे. त्यानंतर छायाचित्रे स्वीकारली जाणार नाहीत.
प्रथम क्रमांकास ३ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास २ हजार ५०० रुपये, तृतीय क्रमांकास २ हजार रुपये, चौथ्या क्रमांकास १ हजार ५०० रुपये आणि पाचव्या क्रमांकास १ हजार रुपये, प्रोत्साहनार्थ १० प्रत्येकी ५०० रुपयांची बक्षिसे असे पारितोषिकाचे स्वरुप आहे.
राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे सकाळी ११ ते सायं. ६ वाजेपर्यंत छायाचित्रे स्वीकारली जातील. कोल्हापूर जिल्हा पर्यटन स्थलदर्शन छायाचित्र स्पर्धेत छायाचित्रकार, विद्यार्थी-विद्यार्थींनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा कोल्हापूर दसरा महोत्सव ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.