कोल्हापूर दि. ९ : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे ३७ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन डॉ. प्रफुल्ल चद्ग रे नगर, महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेज महागाव, ता. गडहिंग्लज येथे १० ते १२ जानेवारी २०१२ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
३७ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या हस्ते १० जानेवारी २०१२ रोजी दुपारी १ वाजता होणार आहे. कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक व्ही. बी. पायमल यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होत असून गडहिंग्लजच्या उपविभागीय अधिकारी निलीमा धायगुडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास गडहिंग्लज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्ग तेली, नेत्रतज्ज्ञ डॉ. बी. आर. फडके, प्रा. डी. एस. पाटील, जे. बी. बार्देस्कर हेही उपस्थितीत राहणार आहेत. सायं. ७ वाजता ‘का होतो निसर्ग प्रकोप’ ? आणि आकाश दर्शन स्लाईड शोचे आयोजन करण्यात आले असून शिवाजी विद्यापीठाचे प्रा. बी. एस. मोहिते माहिती देणार आहेत.
विज्ञान प्रदर्शनाचा समारोप दि. १२ जानेवारी २०१२ रोजी दुपारी १ वाजता कोल्हापुरचे अप्पर जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी डॉ. भाभा अणुशक्ती संशोधन केंद्गाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ सतिश सोळांकुरकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून महागावच्या समर्थ महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे संस्थाध्यक्ष शंकरराव आण्णासाो पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.
गोवा विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधन केंद्ग गोवा यांची फिरती प्रयोग शाळा प्रदर्शन कालावधीत सर्वांना पाहण्यासाठी खुली राहणार आहे. या विज्ञान परिषदेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.