शुक्रवार, १३ जानेवारी, २०१२

कोल्हापूर महोत्सवांतर्गत खाद्य महोत्सव व कलादालनाचे प्रदर्शन इच्छुकांनी स्टॉलसाठी २० जानेवारीपर्यंत संपर्क साधावा

         कोल्हापूर दि. १३ : कोल्हापूर महोत्सव २२ ते २६ जानेवारी २०१२ या कालावधी साजरा केला जाणार आहे. या महोत्सवांतर्गत प्रायव्हेट हायस्कुल, कोल्हापूर येथे खाद्य महोत्सव (फूड फेस्टीव्हल) व कलादालन विषयक कार्यक्रम यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनातील स्टॉल या कालावधीत महिला बचत गट व कांही खाजगी संस्था यांना नाममात्र रक्कम एक हजार प्रमाणे भाड्याने देण्याचे ट्रस्टने ठरविले आहे. 
      इच्छुकांनी या स्टॉलसाठी श्रीमती मोहिनी चव्हाण, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, नागाळा पार्क, कोल्हापूर (पुरवठा शाखा) यांच्याशी दि. २० जानेवारी २०१२ पर्यंत साधावा, असे जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.