कोल्हापूर दि. २० : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, (विद्या परिषद) पुणे यांच्याकडे सन २०१०-११ साठी पत्राद्वारे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रस्ताव पाठविले आहेत व त्यांच्याकडे नोंद झालेली आहे, मात्र ज्या उमेदवारांनी कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे अशा अपात्र ठरलेल्या उमेदवारांनी प्रवेशासाठी लागणार्या योग्य त्या सर्व मूळ कागदपत्रांसह शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या कार्यालयात २४ जानेवारी २०१२ रोजी सकाळी ११ वाजता उपस्थित रहावे, असे प्राथमिक शिक्षणाधिकार्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.