शनिवार, २१ जानेवारी, २०१२

कोल्हापूर महोत्सव २०१२ शिवाजी स्टेडियममध्ये प्रवेशाचे नियोजन

          कोल्हापूर दि. २१ : कोल्हापूर महोत्सवांतर्गत २२ जानेवारी ते २६ जानेवारी २०१२ पर्यंत शिवाजी स्टेडियम, कोल्हापूर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिवाजी स्टेडियमयमध्ये प्रवेशाबाबत रावणेश्वर मंदिर जवळील मुख्य गेटमधून गुलाबी रंगाच्या व्हीआयपी सन्मानिकाधारक तसेच तीन हजार रुपयांच्या गुलाबी रंगाचे प्रवेशिकाधारक व दोन हजार रुपयांचे हिरव्या रंगाचे प्रवेशिकाधारकांना प्रवेश देण्यात येईल.
      टेंबे रोड येथील गेटमधून पिवळ्या सन्मानिकाधारक, एक हजार रुपयांचे निळ्या प्रवेशिकाधारक व पाचशे रुपयांचे पिवळ्या प्रवेशिकाधारक यांना प्रवेश देण्यात येईल. गॅलरीमध्ये जाण्यासाठी ४ गेटस्‌ उपलब्ध असून त्यासाठी कोणत्याही प्रवेशिकेची आवश्यकता असणार नाही. हा प्रवेश सर्वांसाठी मोफत आहे.
      कोल्हापूर महोत्सव कार्यक्रमासाठी येणार्‍या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंगची व्यवस्था के. एस. ए. ऑफिस, साठमारी ग्राऊंड, टेंबे रोड व शिवाजी स्टेडियम भोवताली रिकाम्या जागेत करण्यात आली असल्याचे जिल्हा दंडाधिकारी, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.