कोल्हापूर दि. २ : कोल्हापूर जिल्हा परिषद/पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीकरिता राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडील ३० डिसेंबर २०११ च्या पत्रानुसार मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. तसेच राज्य निवडणुक आयुक्तांच्या ३० डिसेंबर २०११ च्या आदेशान्वये कोल्हापूर जिल्हा परिषद/पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता दि. ५ जानेवारी २०१२ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीमधून प्रारुप यादी तयार करण्यात येणार असून ती यादी दि. ९ जानेवारी २०१२ रोजी प्रसिध्द केली जाणार आहे.
या प्रारुप मतदार यादीची प्रत तहसिलदार यांच्या कार्यालयामध्ये नागरिकांना पाहण्यासाठी व निरीक्षणासाठी उपलब्ध होईल. यादी संदर्भात नागरिकांच्या कांही हरकती किंवा सूचना असल्यास त्या दि. १३ जानेवारी २०१२ पर्यंत तालुक्याचे संबंधित तहसिलदार यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत लेखी सादर कराव्यात. या दिनांकानंतर प्राप्त झालेल्या हरकती/सूचनांचा विचार करण्यात येणार नाही, असे जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने आगामी जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे जाहीर केला आहे. निवडणुकीच्या टप्प्यापुढे कंसात टप्पा सुरु करण्याची / पूर्ण करण्याची तारीख दर्शविली आहे. १) मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक (५ जानेवारी २०१२), २) राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरुन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांकरिता तयार केलेली मतदार यादी हरकती व सूचना मागविण्याकरिता प्रसिध्द करण्याचा दिनांक (९ जानेवारी २०१२), ३) मतदार यादीसंदर्भात हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक (१३ जानेवारी २०१२), ४) निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अधिनियमाच्या कलम १३ खाली अधिप्रमाणित करण्याचा दिनांक (१७ जानेवारी २०१२), ५) निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या मतदार याद्या लोकांच्या माहितीसाठी ठेवण्यात आल्या आहेत याबाबतची सूचना प्रसिध्द करण्याची तारीख (१७ जानेवारी २०१२).
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.