कोल्हापूर दि. २१ : प्रजासत्ताक दिनाच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय ध्वजारोहणाचा समारंभ गुरुवार दि. २६ जानेवारी २०१२ रोजी सकाळी ठिक ९.१५ वाजता कोल्हापुरातील श्री शाहू स्टेडियम (छ. शिवाजी स्टेडियमच्या पूर्वेकडील स्टेडियम) येथे आयोजित केला आहे. राज्याचे सहकार व संसदीय कार्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. या राष्ट्रीय समारंभास सर्व लोकप्रतिनिधी, सन्माननीय नागरिक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, सर्व खाते प्रमुख आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले आहे.
या कार्यक्रमास नागरिकांना उपस्थित राहता यावे म्हणून सकाळी ८.४५ ते १० च्या दरम्यान कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करु नये. ज्यांना ध्वजारोहणाचा स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करावयाचा आहे त्यांनी तो २६ जानेवारी २०१२ रोजी सकाळी ८.४५ पूर्वी किंवा १० वाजल्यानंतर आयोजित करावा.
२६ जानेवारी रोजी ज्या ठिकाणी दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज उभारण्यात येतो अशा सर्व शासकीय इमारतींवर, किल्ल्यांवर तसेच ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत, असेही जिल्हाधिकार्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.