बुधवार, १८ जानेवारी, २०१२

कोल्हापूर महोत्सवाकरिता स्वयंसेवकांची नियुक्ती

कोल्हापूर दि. १८ : जिल्हा प्रशासन व कोल्हापूर दसरा महोत्सव ट्रस्टमार्फत कोल्हापूर शहरामध्ये २२ ते २६ जानेवारी २०१२ या कालावधीत कोल्हापूर महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कोल्हापूर महोत्सवाचे नियोजन शिस्तबध्दपणे होण्यासाठी सामाजिक काम करण्याची आवड असणार्‍या इच्छुक युवक-युवतींनी स्वयंसेवक पदासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोल्हापूर येथे सुट्टीचे दिवस सोडून कार्यालयीन वेळेत नावाची नोंद करावी. स्वयंसेवक १७ ते ५० वयोगटातील असावेत. क्रीडा मंडळे, सामाजिक सेवाभावी संस्था, तसेच माजी सैनिक संघटनांतील तरुणांचा सहभाग अपेक्षित आहे.
          स्वयंसेवक कामासाठी कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला जाणार नसून स्वयंसेवक म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना महोत्सव समाप्तीनंतर स्वयंसेवक म्हणून काम केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देण्यात येईल. जास्तीत जास्त युवक-युवतींनी, क्रीडा मंडळांनी तसेच माजी सैनिक संघटनांनी स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हावे असे आवाहन कोल्हापुरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त ले. कर्नल सुहास नाईक यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.