शनिवार, ७ जानेवारी, २०१२

जिल्हा परिषदेकडील विविध निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी ई-टोकन रजिस्ट्रेशन करणे अत्यावश्यक

        कोल्हापूर दि. ७ : शासनामार्फत विविध विकासात्मक कामे, सेवा, वस्तुंच्या खरेदीसाठी निधी खर्च करताना निविदा प्रक्रियेचा अवलंब करण्यात येतो. प्रचलित पध्दतीमध्ये बदल करुन बांधकामे, साहित्य व सेवा पुरवठा अशा विविध बाबींची कामे वाटप करताना, वस्तुंचा व सेवांचा पुरवठा करुन घेताना अवलंबावयाच्या प्रक्रियेत सुटसुटीतपणा व जास्तीत जास्त पारदर्शीपणा असावा यासाठी ई-टेंडरिंग पध्दतीचा अवलंब करावयाचा निर्णय शासनाने घेतला आहे. ई-टेंडरच्या प्रक्रियेसाठी ई-टोकन रजिस्ट्रेशन प्राप्त करुन घेण्याबाबत कोल्हापुरच्या जिल्हा परिषदेमार्फत यापूर्वीच आवाहन करण्यात आले होते.
      ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त असलेल्या कार्यालयात दि. १ जानेवारी २०१२ पासून ई-टेंडरिंग ही कार्यप्रणाली सुरु करण्यात आली आहे. १ जानेवारी २०१२ पासून प्रसिध्द होणार्‍या सर्व प्रकारच्या रुपये पाच लाखावरील बांधकाम, साहित्य व सेवा पुरवठा प्रकारच्या निविदामध्ये इच्छुक मक्तेदारांना ई-टोकन रजिस्ट्रेशन खेरीज निविदेत सहभागी होता येणार नाही. जिल्हा परिषदेकडील ई-निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी इच्छुकांनी ई-टोकन रजिस्ट्रेशन प्राप्त करुन घेणे अत्यावश्यक आहे, असे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी गणेश पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.