शनिवार, ७ जानेवारी, २०१२

कोल्हापुरात ९ व १० जानेवारीला जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन

        कोल्हापूर दि. ७ : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन ९ व १० जानेवारी २०१२ रोजी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे करण्यात आले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
      सोमवार दि. ९ जानेवारी २०१२ रोजी लहान गट (इयत्ता पहिली ते चौथी) व १० जानेवारी २०१२ रोजी मोठा गट (इ. पाचवी ते सातवी) स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांमध्ये समूहगीत, नाट्यीकरण, समुहनृत्य, कथाकथन व प्रश्नमंजुषा अशा पाच प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
      कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून प्रथम केंद्गस्तर स्पर्धा व त्यानंतर तालुकास्तर स्पर्धांमधून प्रथम क्रमांक विजेते संघ व स्पर्धक विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सहभागी होणार आहेत. या स्पर्धेस जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.