कोल्हापूर दि. १७ : महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळामार्फत राबविण्यात येणारे अभ्यासक्रम चालविण्यासाठी मान्यता देण्यात आलेल्या संस्थेचे अभ्यासक्रम चालविण्यासाठीची मान्यता नुतनीकरण करणे आवश्यक आहे.
सन २०११-१२ पर्यंत मान्यता देण्यात आलेल्या संस्थांनी नुतनीकरण करण्यासाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, कोल्हापूर कार्यालयाकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. संस्थेकडून १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०१२ पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. दि. १६ फेब्रुवारी २०१२ ते २८ फेब्रुवारी २०१२ पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज स्वीकारले जातील.
ज्या संस्थांना २००२-२००३ मध्ये किंवा त्यापूर्वी मान्यता देण्यात आली आहे अशा संस्थांनी नुतनीकरणासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. तथापि अशा संस्थांनी प्रक्रिया शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. ज्या संस्था नुतनीकरणासाठी अर्ज करणार नाहीत त्या संस्थेची मान्यता रद्द करण्यात येईल याची सर्व संबंधित संस्थांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, शिवाजी तांत्रिक विद्यालय, कोल्हापूर येथे दूरध्वनी क्रमांक ०२३१/२६४४४४३ वर संपर्क साधावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.