शनिवार, २१ जानेवारी, २०१२

आस्थापनांनी तिमाही मनुष्यबळ संख्येचे विवरणपत्र विहित वेळेत पाठविणे

        कोल्हापूर दि. २१ : सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे अधिसूचित करण्यास सक्ती करणारा) कायदा १९५९ नियमावली १९६० मधील तरतुदीनुसार जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्ग कार्यालय प्रत्येक तिमाहीस जिल्ह्यातील केंद्ग शासन, राज्य शासन, तसेच केंद्ग शासन व राज्य शासन अंगीकृत व स्थानिक स्वराज्य संस्था व या अधिनियमाखाली येणार्‍या सर्व खाजगी आस्थापनांकडून प्रत्येक तिमाहीस मनुष्यबळ संख्येचे विवरणपत्र (इ. आर १) संकलीत करते. त्यामुळे या अधिनियमाखाली येणार्‍या सर्व आस्थापनांनी अशी विवरणपत्रे तिमाही संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार हा कालावधी ३१ डिसेंबर २०११ साठी ३० जानेवारी २०१२ असा आहे.
         खाजगी आस्थापनांनीही सप्टेंबर २०११ चे द्विवार्षिक (इ. आर. २) विवरणपत्र विहित वेळेत सादर करावयाची आहेत. विवरणपत्रे विहित वेळेत न पाठविणे, चुकीची पाठविणे व माहिती पाठविण्यास टाळाटाळ करणे हे उपरोक्त कायदा कलम ५ (१) व ५ (२) चा भंग करणारे आहे. तरी सर्व संबंधितांनी विवरणपत्रे विहित वेळेत पाठवून कार्यालयास सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्ग, भवानी मंडप, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.