कोल्हापूर दि. २० : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणूका २०१२ जाहीर केल्या आहेत. हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी नगरपरिषद, इचलकरंजी व वडगांव नगरपालिका, वडगांव यांच्या कार्यक्षेत्राच्या हद्दीतील जागा सोडून इतर ठिकाणी ही निवडणूक घेण्यात येत आहे. तरी निवडणुकीचे कालावधीमध्ये मोर्चा, आंदोलन व उपोषण या कामी सक्षम प्राधिकारी यांच्याकडून परवानगी घेणे आवश्यक असल्याचे हातकणंगले तालुका कार्यकारी दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम १९७३ चे कलम १४४ अन्वये असलेल्या अधिकारास अनुसरुन दुरुस्ती आदेश जारी केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.