कोल्हापूर दि. २१ : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी जिल्हास्तरीय जात पडताळणी पथकाकडे दाखल झालेल्या ५७७ प्रकरणापैकी ३८८ प्रकरणांत जात प्रमाणपत्र देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज दिली.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी अर्ज सादर करतेवेळी जात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असल्याचे सांगून त्यासाठी वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत राज्य शासनाने २१ नोव्हेंबर २०११ अशी निश्चित केली होती. २१ नोव्हेंबर २०११ पर्यंत समितीकडे ५६९ प्रस्ताव दाखल झाले होते. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आठ नवीन प्रकरणे आली, अशी एकूण ५७७ प्रकरणे कार्यवाहीत होती.
समितीसमोरील ५७७ प्रकरणांची छाननी करण्यात आली. त्यापैकी ३८८ प्रकरणात जात वैधता प्रमाणात देण्यात आले आहे. ६९ प्रकरणे फेटाळण्यात आली असून १८ प्रकरणे नस्तीबंद करण्यात आली आहेत. दक्षता पथकाकडे ३० प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असून ७२ प्रकरणे जातीबाबतचा आवश्यक कागदपत्रे आणि पुरावा अपुरा असल्यामुळे फेटाळण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.