सोमवार, १६ जानेवारी, २०१२

सर्व शाळांनी ३१ जानेवारीपर्यंत शालेय प्रतवारी ऑनलाईन भरावी

          कोल्हापूर दि. १६ : सन २०१०-११ या वर्षासाठी सुधारित शालेय प्रतवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने तयार केलेली असून सर्व मान्यता प्राप्त शाळांनी ही प्रतवारी ऑनलाईन भरणे सक्तीचे आहे.
सन २०१०-११ या वर्षाच्या माहितीवर आधारित शालेय प्रतवारी मंडळाने, मंडळाच्या www.gradation.msbshsc.ac.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन दिलेली आहे. कोल्हापूर विभागीय मंडळाच्या सर्व मान्यताप्राप्त शाळांनी शालेय प्रतवारी दि. ३१ जानेवारी २०१२ पर्यंत भरावयाची आहे. प्रतवारीत केलेले बदल नीट लक्षात घेण्यात यावेत. सदर प्रतवारी जनतेसाठी खुली करण्यात आली असून कोणताही नागरिक कोणत्याही शाळेची माहिती वेबसाईटवर पाहू शकणार आहे याची नोंदी घ्यावी.
मार्च २०१२ परीक्षेची प्रवेश पत्रिका देताना प्रतवारी भरली आहे याची खात्री करुनच मंडळाकडून विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रिका दिल्या जातील याची सर्व मुख्याध्यापकांनी नोंद घेऊन आपल्या शाळेची प्रतवारी दि. ३१ जानेवारी २०१२ पर्यंत ऑनलाईन भरावी, असे कोल्हापूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव व्ही. बी. पायमल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.