कोल्हापूर दि. १६ : जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्ग, कोल्हापूरमार्फत दि. २२ जानेवारी २०१२ रोजी सकाळी १० वाजता प्रायव्हेट हायस्कूल, खासबाग, कोल्हापूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात अठरा उद्योजक सहाभागी होणार असून इयत्ता पहिली ते नववी पास, एसएससी, एचएससी, पदवीधर, आयटीआय, पदविकाधारक या शैक्षणिक पात्रतेच्या व वयोमर्यादा १८ ते ३५ मधील एकूण १३१० जागा उद्योजक मुलाखतीद्वारे भरणार आहेत. पुणे येथील एजिस लिमिटेड ही आस्थापना अपंग (अस्थिव्यंग) उमेदवारांची दोनशे पदांकरिता भरती करणार आहे.
रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्गामार्फत जिल्ह्यातील एक हजार उमेदवारांना पोष्टाद्वारे रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पत्रे पाठविण्यात आली आहेत. याशिवाय कार्यालयाच्या वेबसाईटवरही निवेदन प्रसिध्द केले आहे. मेळाव्यास उपस्थित असलेल्या परंतु नोंदणी कार्ड नसलेल्या उमेदवारांना नोंदणी अभियानाद्वारे कार्ड नोंदणी करुन घेण्यात येणार आहे.
चालू वर्षात सन २०११-१२ मध्ये या कार्यालयामार्फत तीन रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यांत एकूण ५२ उद्योजकांनी उपस्थित राहून मुलाखतीद्वारे १४२६ उमेदवारांना नोकरीच्या संधी मिळवून दिल्या आहेत. तरी २२ जानेवारी २०१२ रोजीच्या मेळाव्यास इच्छुक उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्गाचे सहाय्यक संचालक गं. अ. सांगडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.