शनिवार, २१ जानेवारी, २०१२

माजी सैनिक, माजी पोलीस कर्मचारी व सुरक्षा विभागातील सेवा निवृत्त कर्मचार्यांोनी निवडणूक बंदोबस्ताकरिता नावे नोंदवावीत

कोल्हापूर दि. २१ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०१२ साठी पोलीस दलाकडून विशेष पोलीस अधिकारी म्हणून माजी सैनिक, माजी पोलीस कर्मचारी व इतर सुरक्षा विभागातील सेवा निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना बंदोबस्ताकरिता घेण्यात येणार आहे.
           जे माजी सैनिक, माजी पोलीस कर्मचारी आणि इतर सुरक्षा विभागातील सेवा निवृत्त झालेले कर्मचारी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक बंदोबस्त करण्यास इच्छुक असतील त्यांनी नजिकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून आपली नावे नोंदवावीत. या कामी शासन नियमाप्रमाणे निवडणूक भत्ता देण्यात येणार आहे, असे पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.