गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

राधानगरी धरणातून 2128 क्युसेक्स विसर्ग जिल्ह्यातील 2 बंधारे पाण्याखाली

 


      कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 234.21 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 700 व सिंचन विमोचकातून 1428 असा एकूण 2128 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र. 3 खुला झाला आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये आज राधानगरी-234.21, तुळशी -97.91, वारणा -974.18, दूधगंगा-719.12, कासारी- 78.04, कडवी -69.18, कुंभी-76.69, पाटगाव 105.10, चिकोत्रा- 43.12, चित्री -53.27, जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -42.14, जांबरे- 23.23 आंबेआहोळ - 30.98  इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 15.1, फूट, सुर्वे- 18, रुई 43.6, इचलकरंजी 40, तेरवाड 37, शिरोळ -27.9  तर नृसिंहवाडी 27 फूट इतकी पाणी पातळी आहे.

जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील रुई व इचलकरंजी  हे 2 बंधारे पाण्याखाली आहेत.

 

00000

 

 

बालगृहातील बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी कार्यशाळा

 


   कोल्हापूर, दि. 30 (जिमाका): महिला व बाल कल्याण विभागांतर्गत राज्यात मुला-मुलींच्या नोंदणीकृत निवासी संस्था कार्यरत आहेत. तसेच बालगृह, शिशुगृह, खुले निवारा गृह व विधिसंघर्षग्रस्त बालकांसाठी निरिक्षण गृह आहेत. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर बालगृह, शिशुगृह, खुले निवारा गृह व निरिक्षण गृहातील बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, डायटमार्फत मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलात कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेत बालकांचा शैक्षणिक गुणवत्ता स्तर तपासणे, समुपदेशकांची मदत घेणे, जीवन कौशल्य आत्मसात करण्याबाबत मार्गदर्शन करुन त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. बालकाची भावनिक गरज भागवण्यासाठी त्यांची आई होऊन काम करा, हे उदात्त व पवित्र असे काम आहे, ही मुले राष्ट्राची संपत्ती आहेत, आपण सर्वजण मिळून बाल रक्षक होऊन व्रतस्थ दृष्टीने काम करूया, असे मत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.आय. सी. शेख यांनी व्यक्त केले. बालगृहातील सर्वच मुलांना समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात येईल. पहिली ते आठवीच्या मुलांना भाषा व गणित या विषयाची अध्ययन स्तर तपासणी, शिष्यवृत्ती, दीक्षा ॲप याबाबत मार्गदर्शन करायचे आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

या मुलांच्या भावनिक व मानसिक गरजा ओळखून त्यांचा बौद्धिक विकास होण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी कटिबद्ध राहुया, असे मत डाएटच्या ज्येष्ठ अधिव्याख्याता व समता विभागप्रमुख डॉ. अंजली रसाळ यांनी केले. निशा काजवे यांनी अध्ययन स्तर निश्चितीबाबत मार्गदर्शन केले. समुपदेशक सरला पाटील यांनी संकुलातील विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज व महत्त्व किती गरजेचे आहे याबाबत संवाद साधला. शुभांगी मेथे- पाटील यांनी दीक्षा ॲप बाबत माहिती दिली.

कार्यशाळेस बालसंकुलातील सर्व अधिकारी,कर्मचारी, बालरक्षक उपस्थित होते. यावेळी  उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. यावेळी बाल संकुलातील अधीक्षक राजू बिद्रेवाडी व पी. के. डवरी यांनी मनोगते व्यक्त केली.

          संकुलातील प्रशासकीय अधिकारी सारीका पठारे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

0000000

 

         

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना

 


 

कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना (आंबिया बहार) सन २०२१-२२ मध्ये राबविण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. आंबिया बहारात जिल्ह्यात  द्राक्षे, केळी, आंबा व काजू या फळपिकासाठी अधिसुचीत महसुल मंडळामध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी एच.डी.एफ.सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीची योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा म्हणून निवड करण्यात आली आहे.

आंबिया बहार सन २०२१-२२ मध्ये नमूद फळपिकांकरीता प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम, विमा हप्ता आणि योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत खालीलप्रमाणे आहे.

          द्राक्ष फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम 3 लाख 20 हजार रू. दि. 15 ऑक्टोबर अंतिम मुदत. केळी फळपिकासाठी 1 लाख 40 हजार रु., शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता 11 हजार 200 रु., अंतिम मुदत 31 ऑक्टोबर,  आंबा- 1 लाख 40 हजार रु. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता 14 हजार रु. अंतिम मुदत 31 डिसेंबर व काजू या फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम 1 लाख रु. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता 9 हजार रु. व अंतिम मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत राहील.

आंबिया बहारामध्ये अतिरिक्त विमा हप्ता भरून गारपीटीपासून विमा संरक्षण घेता येईल. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक स्वरुपाची असून कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी व्हायचे नसल्यास अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर तसे घोषणापत्र संबंधित बँकेस/वित्तीय संस्थेस देणे बंधनकारक आहे. योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी जवळच्या प्राधिकृत बँका / प्राथमिक कृषि पत पुरवठा सहकारी पतसंस्था / संबंधित विमा कंपनीची कार्यालये किंवा विमा प्रतिनिधींशी संपर्क साधून अथवा पिक विमा संकेतस्थळ किंवा विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारे विहित प्रपत्रात विमा प्रस्ताव योग्य त्या विमा हप्त्यासह तसेच आवश्यक त्या कागदपत्रांसह विहीत वेळेत सादर करावेत.

अर्जदाराने आपल्या अर्जासोबत आधार कार्ड/ आधार नोंदणीची प्रत, 7/12 उतारा, भाडेपट्टा करार असलेल्या शेतक-यांचा करारनामा / सहमती पत्र घोषणापत्र आणि बँक पासबुकची प्रत इ. कागदपत्रे सादर करून प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक साक्षांकन करणे बंधनकारक आहे.

 योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, तसेच मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी किंवा राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा अथवा संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांशी संपर्क साधावा. वरील अधिसूचित फळपिकांच्या नुकसानीची जोखीम विम्याच्या माध्यमातून उचलून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचे कार्य त्या योजनेत होत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक उमेश पाटील यांनी केले आहे.

000000

 

 

अनुसुचित जातींतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी 7 ऑक्टोबरपर्यंत महाविद्यालयांनी प्रस्ताव सादर करावेत

 


 

          कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजनेअंतर्गत अनुसुचित जाती, विजाभज इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०११-१२ पासून Mahaeschol या ऑनलाईन प्रणालीमार्फत शिष्यवृत्तीचा लाभ दिला जात होता. ही ऑनलाईन प्रणाली सन २०१७-१८ या आर्थिक वर्षापासुन शासन स्तरावरुन बंद केली आहे. प्रणालीवरील सन २०११-१२ ने २०१६-१७ या कालावधीत तांत्रिक त्रुटी असल्यामुळे प्रलंबित असलेले अर्ज, सन २०१७-१८ मधील Mahaeschol या ऑनलाईन प्रणालीमध्ये नुतनीकरण केलेले मात्र देयक न निघाल्यामुळे प्रलंबित असणारे अर्ज तसेच सन २०१७-१८ मधील प्रथम वर्षास असणाऱ्या विद्यार्थ्यांचे नवीन अर्ज ज्या महाविदयालयांनी सहायक आयुक्त समाजकल्याण  कार्यालयाकडे अद्यापही सादर केलेले नाहीत अथवा सादर केलेले आहेत परंतु एखादा विद्यार्थी राहुन गेलेला आहे, अशा महाविद्यालयांनी  प्रस्ताव या कार्यालयास 7 ऑक्टोबरपर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.                     

जिल्हयातील महाविदयालयांना कार्यालयाकडून वारंवार झालेल्या बैठकीव्दारे Google Meet या ऑनलाईन प्रणालीवरुन होणाऱ्या बैटकामध्ये, कार्यालयांकडून वारंवार केलेला पत्रव्यवहार याव्दारे अर्ज सादर करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

सन २०११-१२ ते सन २०१७-१८ या कालावधीतील प्रलंबित प्रस्ताव सादर करण्यासाठी ही अखेरची मुदत देण्यात येत आहे. महाविद्यालयाचे प्रस्ताव विहीत वेळेत कार्यालयास सादर करावेत. प्रस्ताव सादर न केल्यास व या कालावधीतील मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासुन वंचित राहील्यास याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहील, असेही पत्रकात म्हटले आहे.

0000000

 

 

गगनबावडा तालुक्यात 20.1 मिमी पाऊस

 

          कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात 20.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकुण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 6.7, शिरोळ- 1.7, पन्हाळा- 9.1, शाहूवाडी- 14.9, राधानगरी -8.8, गगनबावडा- 20.1, करवीर- 6.3, कागल- 3.1, गडहिंग्लज- 2, भुदरगड- 6.6, आजरा-3.2    चंदगड- 10.4 मिमी  पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

00000

बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१

राधानगरी धरणातून 700 क्युसेक्स विसर्ग इचलकरंजी बंधारा पाण्याखाली

 

 


      कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 235.91 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये आज राधानगरी-235.91, तुळशी -98.20, वारणा -974.19, दूधगंगा-719.12, कासारी- 77.52, कडवी -69.37, कुंभी-76.79, पाटगाव 105.04, चिकोत्रा- 43.12, चित्री -53.41, जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -40.37, जांबरे- 23.230 आंबेआहोळ - 30.978  इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 13.3, फूट, सुर्वे- 16.2, रुई 41.6, इचलकरंजी 37.9, तेरवाड 36.6, शिरोळ -27.6  तर नृसिंहवाडी 27.6 फूट इतकी पाणी पातळी आहे.

जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील इचलकरंजी  हा 1 बंधारा पाण्याखाली आहे.

 

00000

पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना


 

कोल्हापूर, दि.29 (जिमाका):- पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन 2021-22 मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्रॉबेरी (प्रायोगीक तत्वावर) या फळपिकासाठी 30 जिल्ह्यामध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे.

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी होण्या बाबत अथवा न होण्याबाबत घोषणपत्र ज्या बँकेमध्ये पिककर्ज खाते/ किसान क्रेडिट कार्ड खाते आहे तिथे जमा करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे. जेणेकरुन बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसूचित फळपिकांकरिता विहित नमुन्यातील घोषणापत्र संबंधित बँकेत सादर करणे आवश्यक राहिल. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी बॅंकांना कळविणार नाहीत, असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पद्धतीने कर्ज खात्यातुन वजा करण्यात येईल.

अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे (कुळाने / भाडे पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी) या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहार मिळू जास्तीत जास्त 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. त्यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. ही योजना सन 2021-22 आंबिया बहारमध्ये 5 जिल्हा समुहांसाठी खालील विमा कंपन्यांमार्फत राज्यात राबविण्यात येत आहे. जिल्हा समुह निहाय जिल्ह्यांची नावे व कंपनीची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

जिल्हा समूह क्र. (Cluster)

जिल्हे

विमा कंपनीचे नांव व पत्ता

अहमदनगर, अमरावती, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, यवतमाळ

रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.

ग्राहक सेवा क्र. : 18001024088 - दूरध्वनी क्र. 022 - 68623005.

-मेल:- rgicl.maharashtraagri@relianceada.com

2

बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली.

एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि.

ग्राहक सेवा क्र. : 18002660700, दूरध्वनी क्र. 022-62346234

-मेल:-  pmfby.maharashtra@hdfcergo.com

सातारा, परभणी, जालना, लातुर, कोल्हापूर

रायगड, बुलढाणा, जळगाव, नांदेड, पुणे, उस्मानाबाद

भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड

टोल फ्री क्र. : 18004195004, दूरध्वनी क्र. 022 - 61710912

-मेल - pikvima@aicofindia.com 

धुळे, पालघर, सोलापुर, रत्नागिरी, नागपूर, नंदुरबार

रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.

ग्राहक सेवा क्र. : 18001024088, दूरध्वनी क्र. 022 - 68623005.

-मेल:- rgicl.maharashtraagri@relianceada.com

 आंबिया बहार सन 2021-22 मध्ये फळपिक निहाय योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत पुढील प्रमाणे आहे. शेतकऱ्यांनी (कर्जदार व बिगर कर्जदार) योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे, विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था /बँक/आपले सरकार सेवा केंद्र/ विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे/ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक पुढीलप्रमाणे आहे.

 

 

अ.क्र.

फळपिक

विमा संरक्षित रक्कम

गारपीट या हवामान धोक्याकरीता विमा संरक्षित रक्कम

शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग

घेण्याचा अंतिम दिनांक

1

द्राक्ष

320000

106667

दि. १5 ऑक्टोबर 2021

2

मोसंबी

80000

26667

दि. 31 ऑक्टोबर 2021

3

केळी

140000

46667

दि. 31 ऑक्टोबर 2021

4

पपई

35000

11667

दि. 31 ऑक्टोबर 2021

5

संत्रा

80000

26667

दि. 30 नोव्हेंबर 2021

6

काजू

100000

33333

दि. 30 नोव्हेंबर 2021

7

आंबा (कोकण)

140000

46667

दि. 30 नोव्हेंबर 2021

8

आंबा (इतर जिल्हे)

140000

46667

दि. 31 डिसेंबर 2021

9

डाळिंब

130000

43333

दि.14 जानेवारी 2022

10

स्ट्रॉबेरी

200000

66667

दि.14 ऑक्टोबर 2021

         

शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता जिल्हानिहाय वेगवेगळा असु शकतो.

आंबिया बहार सन 2021-22 या वर्षासाठी अधिसूचित फळ पिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी निश्चित करण्यात आला असून निर्धारीत केलेले हवामान धोके लागू झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा कंपनीमार्फत देय होणार आहे. आंबिया बहारातील फळपिकांची विमा नोंदणी करीता राष्ट्रीय पिक विमा पोर्टल (https://pmfby.gov.in) या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच आंबिया बहारात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांसाठी गारपीट या हवामान धोक्यासाठी राज्य शासनामार्फत विमा संरक्षण उपलब्ध करुन देण्यात आलेले असुन गारपीट या हवामान धोक्यासाठी सहभाग ऐच्छिक राहील व याकरीता अतिरिक्त विमा हप्ता देय आहे. ज्या शेतकऱ्यांना गारपीट या हवामान धोक्याकरिता सहभाग नोंदवावयाचा असेल अशा शेतकऱ्यांनी त्यांचा नियमीत व  अतिरिक्त विमा हप्ता हा बँकांमार्फतच भरणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोक्यांची तसेच त्यांना भरावयाच्या विमा हप्त्याची माहिती करुन घेऊन विहित मुदतीमध्ये नजिकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक / वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा. आंबिया बहारातील अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोके, विमा संरक्षित रक्कम, संरक्षण कालावधी, विमा हप्ता इत्यादी बाबतीत  सविस्तर माहितीचा दि. 18 जून 2021 चा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या https://www.maharashtra.gov.in कृषि विभागाच्या http://www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच ई - सेवा केंद्र व बँक स्तरावरही याबाबतची माहिती उपलब्ध करुन देण्याच्या सुचना कृषी विभागाने सहभागी विमा कंपन्यांना दिल्या आहेत.

सहभागी सर्व विमा कंपन्यांनी त्यांच्याकडील जिल्हा व तालुका स्तरावर नियुक्त केलेल्या प्रतिनिधींची नावे मोबाईल क्रमांकासह कृषि विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी सबंधित विमा कंपनीचे तालुका कार्यालय किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे

 

0-0-0-0-0-0