कोल्हापूर, दि. 23 (जिमाका):
प्रशासकीय कामकाज अभ्यासपूर्ण व अधिक लोकाभिमुख करा, अशा सूचना कोल्हापूर विभागाचे
माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांनी केल्या.
कोल्हापूर विभागाच्या
माहिती उपसंचालक पदाचा कार्यभार आज डॉ. संभाजी खराट
यांनी स्विकारला, यावेळी आयोजित बैठकीत त्यांनी कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला.
तसेच जिल्हा माहिती कार्यालयाला भेट देवून पाहणी केली. यावेळी माहिती अधिकारी
वृषाली पाटील, सहायक संचालक फारुख बागवान, क्षेत्रिय प्रचार अधिकारी हंसराज राऊत,
माहिती सहायक एकनाथ पोवार, अमोल पाटील, सतीश शेंडगे, रोहित माने, सचिन वाघ, सतीश
कोरे, अनिल यमकर, साक्षी मोरे, दामू दाते, प्रकाश पाटील, रावसाहेब पाटील, प्रकाश
चव्हाण, स्वप्नाली कुंभार आदी उपस्थित होते.
माहिती उपसंचालक डॉ. संभाजी
खराट म्हणाले, शासकीय कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना
नम्रपणे व सौजन्याची वागणुक देणे गरजेचे आहे. कार्यालयीन कामकाज करताना प्रत्येक
विषय समजून घेवून जनहित जोपासा. कोणताही विषय प्रलंबित राहणार नाही याची दक्षता
घेवून प्रत्येक विषयांचा वेळेत निपटारा करा, अशा सूचनाही माहिती उपसंचालक डॉ.
संभाजी खराट यांनी केल्या.
डॉ. संभाजी खराट यांनी
यापूर्वी मुंबई, कोल्हापूर, कोकण भवन, रत्नागिरी, ठाणे, मंत्रालय याठिकाणी
जिल्हा माहिती अधिकारी तसेच वरिष्ठ सहायक संचालक पदाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या
आहेत. माहिती व जनसंपर्क विभागात समाज माध्यमांचा वापर अधिक प्रभावीपणे करण्यात
त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. तसेच शासनाचे मुखपत्र असणाऱ्या लोकराज्य
मासिकाच्या संपादकाचे कामही त्यांनी यशस्वीरित्या केले आहे. डॉ.खराट यांनी
पत्रकारितेत पीएच. डी. केली असून त्यांची 25 पुस्तके प्रसिध्द झालेली आहेत.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.