कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : राज्यातील पुणे,
नाशिक, रायगड व पालघर या जिल्ह्यांमध्ये पशुधनामध्ये लंपी स्किन रोगाचा
प्रादुर्भाव आढळून आला आहे. लंपी स्किन डिसीज हा गो व महिष वर्गातील जनावरांना
होणार विषाणूजन्य त्वचा रोग आहे. या साथीच्या आजारात प्रामुख्याने जनावरांच्या
शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या रोगाचा प्रसार इतर जिल्ह्यांमध्ये
होण्याची शक्यता असल्याने रोग प्रसारास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने कडक व गोल
आकाराच्या गाठी जनावरामध्ये दिसून आल्यास त्वरीत जवळच्या पशुधन वैद्यकीय अधिकारी
यांच्याशी संपर्क साधावा व जनावराचा औषधोपचार करुन घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी
शंकरराव जाधव यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.