इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१

पर्यटन जनजागृती सप्ताह अंतर्गत शाहू स्मारक येथे वन्यजीव छायाचित्रे प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन







 

·        वन विभागाच्या वतीने छायाचित्रकार सुनील करकरे यांच्या वन्यजीव छायाचित्रांचे प्रदर्शन

·        जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन

·        प्रदर्शन दिनांक 3 ऑक्टोबर 2021 पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत नागरिकांसाठी विनामूल्य सुरु राहणार

 

कोल्हापूर, दि.29 (जिमाका):- 27 सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासन व पर्यटन विभागाच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटन जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून याअंतर्गत ‘डेस्टिनेशन कोल्हापूर’चे ब्रँडिंग करण्यात येत आहे. 

      याच अनुषंगाने आज शाहू स्मारक भवन येथे वन विभागाच्या वतीने छायाचित्रकार सुनील करकरे यांच्या वन्यजीव छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार, दैनिक सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार, दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक विजय जाधव, दैनिक पुण्यनगरीचे निवासी संपादक राजकुमार चौगुले व तरुण भारतचे वरिष्ठ प्रतिनिधी सुधाकर काशीद या मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्वल नागेशकर, उपाध्यक्ष सचीन शानबाग, सचीव सिध्दार्थ लाटकर, क्रेडाईचे आदित्य बेडेकर, कोल्हापूर हायकर्सचे सागर पाटील, कारवा हॉलीडेजचे वसीम सरकावस आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रदर्शनात वन्यजीव प्राण्यांची व अनुषंगिक 92 छायाचित्रे ठेवण्यात आलेली आहेत, अशी माहिती छायाचित्रकार सुनील करकरे यांनी मान्यवरांना दिली. तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जैवविविधतेचे महत्त्व समजण्यासाठी कोल्हापूर, महाराष्ट्र व आपल्या भारत देशाचे जैवविविधतेची माहिती देणारी छायाचित्रे येथे ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील विविध वन्य प्राणी व अनुषंगिक प्राण्यांची छायाचित्रेही प्रदर्शनात ठेवण्यात आली असून या प्रदर्शनाच्या माध्यमातून वन पर्यटनाला चालना मिळावी तसेच या माध्यमातून जैवविविधतेचे संवर्धनही व्हावे, असे श्री. करकरे यांनी सांगितले.

        या प्रदर्शनास उपस्थित मान्यवरांनी जिल्हा प्रशासन व पर्यटन विभागाच्या माध्यमातून दिनांक 26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत राबविला जात असलेला पर्यटन जनजागृती सप्ताह हा स्तुत्य उपक्रम असून या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती झाली पाहिजे. तसेच बाहेरच्या जिल्ह्यातील व इतर राज्य व परदेशातील पर्यटक आपल्या जिल्ह्यात पर्यटनाला येण्यासाठी कोल्हापूर येथील वेगळेपण जगासमोर विविध माध्यमातून दाखवले गेले पाहिजे व येथे आल्यानंतर पर्यटकांना चांगल्या सोयी सुविधा ही मिळाल्या पाहिजेत, या अनुषंगाने ही प्रयत्न केले जावेत अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.

     कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन जनजागृती सप्ताह अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात असून या उपक्रमात प्रशासनाबरोबर जास्तीत जास्त इतर संस्था व कोल्हापूरकर नागरिकांचा सहभाग घेतला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या विविध पर्यटन स्थळांची माहिती एकत्रितपणे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेणेकरून  येथे येणाऱ्या पर्यटकाला येथील सर्व पर्यटनस्थळांची व्यवस्थित माहिती मिळून त्या पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता आला पाहिजे यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. 

       तसेच या पर्यटन जनजागृती सप्ताहअंतर्गत शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनास कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन पुढील काळात  वन पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले. हे वन्यजीव प्रदर्शन नागरिकांसाठी दिनांक 3 ऑक्टोबर 2021 पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार असून प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) विशाल माळी यांनी दिली.

      प्रारंभी जिल्हाधिकारी राहुल रेखावर, दैनिक सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार, दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक विजय जाधव, दैनिक पुण्यनगरीचे निवासी संपादक राजकुमार चौगुले व तरुण भारतचे वरिष्ठ प्रतिनिधी सुधाकर काशीद या मान्यवरांच्या हस्ते फीत कापून वन्यजीव प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी वन्यप्रेमी नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

 

   

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.