गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्ह्यातील निर्यातदारांसाठी संमेलन

 

 

        कोल्हापूर, दि. 23 (जिमाका): जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ‘आजादी का अमृत महोत्सव’ -75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत तसेच जिल्हा निर्यात प्रचलन समिती यांच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि. 24 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1.30 या वेळेत कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशन, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर येथे जिल्ह्यातील निर्यातदारांचे संमेलन संपन्न होणार आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके यांनी दिली आहे.

       आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग वाढविण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनामार्फत विविध स्तरावर पुढाकार घेण्यात येत आहे. त्यामध्ये वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, ॲटो काम्पोनंन्ट, कृषी उत्पादन, चर्मोद्योग, आयटी/ आयटीएस इ. औद्योगिक क्षेत्रे निर्यात वाढीसाठी आधोरेखित करण्यात आली आहेत.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.