शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

महासैनिक दरबार हॉल व लॉनकरिता कंत्राटी पध्दतीने अशासकीय सहायक व्यवस्थापक पद भरती

 


कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अखत्यारित महासैनिक दरबार हॉल व लॉनकरिता तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने एकत्रीत मानधनावर अशासकीय सहायक व्यवस्थापक पद भरण्यात येणार आहे. यासाठी माजी सैनिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. इच्छुकांनी आपले अर्ज दि. 4 ऑक्टोबरपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले यांनी केले आहे.      

अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे दूरध्वनी क्र. 0231-2665812 वर संपर्क साधावा.         

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.