बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

महावेध प्रकल्पांतर्गत हवामानाची माहिती

 


          कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) : राज्यात महसूल मंडळ स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करणे व हवामान घटकांची आकडेवारी संकलित करण्यासाठी स्कायमेट वेदर सर्व्हिसेस व महाराष्ट्र शासन यांच्या सार्वजनिक-खासगी भागीदारीतून महावेध प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रकल्पांतर्गत सद्यस्थितीत उभारलेल्या २ हजार १०८ केंद्रातून तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या हवामान घटकांच्या अचूक वेळेच्या माहितीची नोंद होत आहे, अशी माहिती पुणे कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी दिली आहे.

या प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे नोंदविलेली केंद्र स्थापनेपासून आजपर्यंत ३६५ दिवसांपुर्वीची कमाल व किमान तापमान, सकाळी ८.३० वा. व सायंकाळी ५.३० वा.ची सापेक्ष आद्रता, वाऱ्याचा झोत व पर्जन्यमान या हवामान घटकांची दैनंदिन माहिती महावेध पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही माहिती http://services.mahavedh.com/mahavedh_portal/ या संकेत स्थळावर Historical data या मथळ्याखाली जिल्हा, तालुका, मंडळ व ३० दिवसांचा अपेक्षित कालावधी निवडून पाहता येईल.

0000000

 

                                                        

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.