बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा

 

कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय) : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

       गुरूवार दि. 9 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वा. कागल निवासस्थान येथे आगमन व राखीव. दुपारी 12.30 वा. कागल निवासस्थान येथून मोटारीने बेलेवाडी काळम्माकडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरीच्या ऑक्सिजन प्लॅटचा उद्घाटन समारंभ. (स्थळ : बेलेवाडी काळम्मा, ता. कागल) दुपारी 2 वा. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या शुभहस्ते आंबेओहोळ प्रकल्पाचे लोकार्पण व जलपूजनाचा कार्यक्रम. (स्थळ : उत्तूर, ता. आजरा) दुपारी 3 वा. उत्तूर येथून कागल/ कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी 4 वा. कागल/कोल्हापूर येथे आगमन व राखीव.

          शुक्रवार दि. 10 सप्टेंबर रोजी राखीव. दुपारी 4 वा. गहिनीनाथ समाचारच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहमेळाव्यास उपस्थिती (स्थळ : स्व, दिलिपराव सणगर सभागृह, ता. कागल)

शनिवार दि. 11 सप्टेंबर सकाळी 10 वा. कागल निवासस्थान येथून जयसिंगपूरकडे प्रयाण. सकाळी 11 वा. जयसिंगपूर येथे आगमन व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भेाजन कार्यक्रमाचे उद्घाटन (स्थळ : जयसिंगपूर)  दुपारी 12 वा. जयसिंगपूर येथून कागल निवासस्थानाकडे प्रयाण. दुपारी 1 वा. कागल निवासस्थान येथे आगमन व राखीव. सकाळी 4.45 वा कागल येथून कसबा सांगावकडे प्रयाण. सायं. 5 वा. कसबा सांगाव येथे आगमन व तेथील विविध विकास कामांचे उद्घाटन. (स्थळ : कसबा सांगाव, ता. कागल) सायं. 5.45 वा. कसबा सांगाव येथून मोटारीने कागल निवासस्थानाकडे प्रयाण. सायं. 6 वा. कागल निवासस्थान येथे आगमन व राखीव.

रविवार दि. 12 सप्टेंबर रोजी  राखीव. सायं. 4 वा. कागल निवासस्थान येथून हसूर बुद्रुककडे प्रयाण. सायं. 5 वा. हसूर बुद्रुक येथीत विविध विकास कामांचे उद्घाटन (स्थळ : हसूर बुद्रुक, ता. कागल) सायं. 6 वा. हसूर बुद्रुक येथून कागल निवासस्थानाकडे प्रयाण. सायं. 7 वा. कागल निवासस्थान येथे आगमन व राखीव.

सोमवार दि. 13 सप्टेंबर रोजी सकाळी 10.45 वा. कागल निवासस्थान येथून  के.डी.सी.सी बँक कोल्हापूरकडे प्रयाण. सकाळी 11 वा. के.डी.सी.सी. बँक कोल्हापूर येथे आगमन व के.डी.सी.सी. बँकेच्या कार्यकारी  समितीची  बैठक. (स्थळ : के.डी.सी.सी. बँक कोल्हापूर) राखीव. सायं. 5 वा. कागल निवासस्थान येथून बेळगाव विमानतळाकडे प्रयाण.

0000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.