कोल्हापूर, दि. 6
(जिल्हा माहिती कार्यालय): जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय लोकशाही
दिनामध्ये 15 अर्ज प्राप्त झाले आहेत.
यावेळी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, महानगरपालिकेचे
अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
अजयकुमार माने, तहसिलदार रंजना बिचकर यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित
होते.
आजच्या लोकशाही दिनात महसूल 9, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय 2, गट विकास
अधिकारी करवीर 1, जिल्हा परिषद 1 पोलीस
अधीक्षक कार्यालय 2 असे एकूण 15 अर्ज
प्राप्त झाले असल्याची माहिती
तहसिलदार रंजना बिचकर यांनी दिली. यावेळी मागील लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या
अर्जांचा आढावा घेण्यात आला.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.