कोल्हापूर, दि.
28 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा विशेष
संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमातंर्गत दि. 1
जानेवारी 2022 रोजी किंवा तत्पुर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या सर्व पात्र
नागरीकांना मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे. त्याचबरोबर मतदार यादीतील नाव
वगळणी करणे, तपशील दुरुस्ती करणे व एकाच मतदार संघात स्थानांतर करणे ही संधी देखील
उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमातंर्गत आपली नोंदणी प्राधान्याने करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी
तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी केले आहे.
पुनरिक्षण कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
अ.क्रं |
उपक्रम |
कालावधी |
पूर्व-पुनरिक्षण
कार्यक्रम |
||
1 |
i) दुबार/समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर
करणे इ. ii) मतदान केंद्रस्तरीय
अधिकारी यांचेद्वारा घरोघरी भेट देऊन तपासणी/पडताळणी. iii) योग्यप्रकारे विभाग/भाग
तयार करणे आणि iv) मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण
व प्रमाणीकरण करणे |
दिनांक 9 ऑगस्ट, 2021 (सोमवार)
ते दिनांक 31 ऑक्टोबर, 2021
(रविवार) |
प्रत्यक्ष पुनरिक्षण कार्यक्रम |
||
2. |
एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी
प्रसिध्द करणे |
दिनांक 01 नोव्हेंबर, 2021
(सोमवार) |
3. |
दावे व हरकती स्वीकारण्याचा
कालावधी |
दिनांक 01 नोव्हेंबर, 2021
(सोमवार) ते दिनांक 30 नोव्हेंबर, 2021
(मंगळवार) |
4. |
विशेष मोहिमांचा कालावधी |
दावे व हरकती स्वीकारण्याच्या
कालावधीत, मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी निश्चित केलेला दिवस |
5. |
दावे व हरकती निकालात काढणे |
दि.20 डिसेंबर,2021 (सोमवार)
पर्यत |
6. |
मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी
करणे |
दि.05 जानेवारी ,2022 (बुधवार) |
कार्यक्रमात दि. 1
नोव्हेंबर 2021 (सोमवार) रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी करण्यात येणार आहे. ही
मतदार यादी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी/उपजिल्हाधिकारी (ERO),
सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार (AERO), अतिरीक्त सहायक मतदार नोंदणी
अधिकारी (AAERO), तसेच
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे अवलोकनार्थ उपलब्ध असेल. त्याचबरोबर ही
मतदार यादी आयोगाच्या https://ceo.maharashtra.gov.
या कार्यक्रमात दिनांक 01 नोव्हेंबर, 2021 (सोमवार) व
दिनांक 30 नोव्हेंबर, 2021 (मंगळवार) या कालावधीत दावे
व हरकती (नमुना क्रमांक 06, 06अ, 07, 08 व 08अ) स्वीकारण्यात येणार आहेत.
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी पात्र परंतु अद्यापही मतदार यादीत नाव
सामाविष्ट नसलेल्या सर्व पात्र नागरीकांना मतदार यादीत नाव सामाविष्ट करण्यासाठी संधी
उपलब्ध झालेली आहे.
मतदारांनी
आवश्यकतेप्रमाणे खालील अर्ज भरुन द्यावेत.
1) नमुना क्रमांक
6 (मतदार यादीत नाव सामाविष्ट करावयासाठी अर्ज)
2) नमुना क्रमांक
7 (मतदार यादीतील नावांची वगळणी करावयासाठी अर्ज)
3) नमुना क्रमांक
08 (मतदार यादीतील तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी अर्ज)
4) नमुना क्रमांक
08 अ (एकाच मतदारसंघात मतदार यादीचे नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी अर्ज)
मतदारांनी आपल्या आवश्यकतेप्रमाणे वरील नमुने मतदान
केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा संबंधित तालुक्यातील तहसिल कार्यालय (निवडणूक
शाखा) व कोल्हापूर शहराच्या हद्दीमध्ये रहिवास करत असलेल्या मतदारांनी
एल.बी.टी.शाखा, शिवाजी मार्केट, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर यांच्याकडे
सादर करावेत. किंवा आयोगाने विकसित केलेल्या NVSP Voter Portal तसेच Voter Helpline APP द्वारे करण्यात यावे. त्याच्या लिंक
खालिलप्रमाणे आहेत.
मतदार सेवा पोर्टल (NVSP): http://www.nvsp.in/
वोटर पोर्टल : https://voterportal.eci.gov.
वोटर हेल्पलाइन ॲप (Voter
Helpline APP) : हे ॲप डाऊनलोड
करण्यासाठी आहे.
Play Stort Link (Andriod
मोबाईलकरीता) :
https://play.google.com/store/
I-Phone Store Link (I-phone
मोबाईलकरीता)
https://apps.apple.com/in/app/
आगामी जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणूक, नगरपालिका
व महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार यादीत
नावाची नोंद असेल तरच निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.