कोल्हापूर दि. 27 (जिमाका)
:- जागतिक पर्यटन दिन व सप्ताह जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. या
निमित्ताने आज कोल्हापूर शहरात, कोल्हापूर- पावनखिंड-आंबा-कोल्हापूर आणि कोल्हापूर
ते गगनबावडा या मार्गावर पर्यटन जनजागृतीसाठी मोटार सायकल रॅली काढण्यात आली. दसरा
चौकात या मोटार सायकल रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी झेंडा
दाखवून केला.
पर्यटन जनजागृतीसाठी ट्रॅव्हल एजंट असोसिएशन,
कोल्हापूरच्यावतीने काढण्यात आलेली मोटार सायकल रॅली दसरा चौक येथून खानविलकर
पेट्रोल पंप- जिल्हाधिकारी कार्यालय-धैर्य प्रसाद चौक-ताराराणी पुतळा चौक-सयाजी
हॉटेल-उड्डाण पूल- कमला कॉलेज- बस रुट-माऊली पुतळा-राजारामपुरी मेन रोड-जनता बाजार
चौक-बागल चौक- उमा टॉकीज चौक, टायटन चौक -पुन्हा दसरा चौक या मार्गावर होणार आहे.
डी. जे. रेसर ग्रुपच्यावतीने पर्यटन जनजागृती
काढण्यात आलेली मोटार सायकल रॅली कोल्हापूर- पावनखिंड-आंबा-कोल्हापूर या
मार्गावरुन तर रायडर्स ऑफ कावासाकी यांच्यावतीनेही काढण्यात आलेली मोटार सायकल
रॅली कोल्हापूर- गगणबावडा-कोल्हापूर या मार्गावर होणार आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.