मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

१८ वर्षावरील सर्व नागरिकांचे मॅसिव्ह ड्राईवच्या माध्यमातून लसीकरण

 

 

 

 


 

     कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यात १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पुर्ण करण्याचे उददीष्ट ठेवले आहे. याअनुषंगाने जिल्ह्यातील एकुण २ लाख ५० हजार लाभार्थ्यांना दि. २९ सप्टेंबर रोजी मॅसिव्ह ड्राईवच्या माध्यमातून लसीकरण करण्याचा निश्चय करण्यात आला आहे.

कोविड १९ संभाव्य तिस-या लाटेची माहे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये शक्यता वर्तविण्यात आली आहे. यापूर्वी सर्व नागरिकांचे लसीकरण कोविड १९ मॅसिव्ह  ड्राईव्हच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत आहे. कोविड १९ लसीकरण मॅसिव्ह  ड्राईव्हमध्ये १८ वर्षावरील लाभार्थ्यांना लस देवून त्यांना संरक्षित करण्यात येणार असून त्याकरीता इतर विभागांचाही सहभाग घेण्यात येत आहे. यामध्ये महसुल विभाग, महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग, ग्राम विकास विभाग, अल्पसंख्याक विभाग, सामाजिक न्याय व गृह विभाग इ. विभागांचा समावेश आहे. या विभागाचे ग्रामस्तरावरील सर्व कर्मचारी कोविड लसीकरण सत्राच्या ठिकाणी सोशल मोबिलायझेशन, डाटा ऍन्ट्री, जनजागृती इत्यादी कामामध्ये सहभाग घेणार आहेत.

जिल्ह्यामध्ये १२ तालुक्यातील एकुण ३७१ गावामध्ये कोविड १९ मॅसिव्ह ड्राईवचे आयोजन करण्यात आले असून यासाठी या दिवशी मॅसिव्ह ड्राईवसाठी एकुण 1 हजार ७० इतक्या टिमचे नियोजन केले असून यासाठी जिल्ह्यातील १० हजार ७०० इतके अधिकारी व कर्मचारी काम करणार आहेत.

 

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील तसेच आरोग्य व बांधकाम सभापती वंदना जाधव यांनी नागरिकांना कोविड १९ मॅसिव्ह ड्राईव लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.