इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१

पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना


 

कोल्हापूर, दि.29 (जिमाका):- पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन 2021-22 मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्रॉबेरी (प्रायोगीक तत्वावर) या फळपिकासाठी 30 जिल्ह्यामध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे.

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी होण्या बाबत अथवा न होण्याबाबत घोषणपत्र ज्या बँकेमध्ये पिककर्ज खाते/ किसान क्रेडिट कार्ड खाते आहे तिथे जमा करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे. जेणेकरुन बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसूचित फळपिकांकरिता विहित नमुन्यातील घोषणापत्र संबंधित बँकेत सादर करणे आवश्यक राहिल. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी बॅंकांना कळविणार नाहीत, असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पद्धतीने कर्ज खात्यातुन वजा करण्यात येईल.

अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे (कुळाने / भाडे पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी) या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहार मिळू जास्तीत जास्त 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. त्यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. ही योजना सन 2021-22 आंबिया बहारमध्ये 5 जिल्हा समुहांसाठी खालील विमा कंपन्यांमार्फत राज्यात राबविण्यात येत आहे. जिल्हा समुह निहाय जिल्ह्यांची नावे व कंपनीची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

जिल्हा समूह क्र. (Cluster)

जिल्हे

विमा कंपनीचे नांव व पत्ता

अहमदनगर, अमरावती, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, यवतमाळ

रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.

ग्राहक सेवा क्र. : 18001024088 - दूरध्वनी क्र. 022 - 68623005.

-मेल:- rgicl.maharashtraagri@relianceada.com

2

बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली.

एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि.

ग्राहक सेवा क्र. : 18002660700, दूरध्वनी क्र. 022-62346234

-मेल:-  pmfby.maharashtra@hdfcergo.com

सातारा, परभणी, जालना, लातुर, कोल्हापूर

रायगड, बुलढाणा, जळगाव, नांदेड, पुणे, उस्मानाबाद

भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड

टोल फ्री क्र. : 18004195004, दूरध्वनी क्र. 022 - 61710912

-मेल - pikvima@aicofindia.com 

धुळे, पालघर, सोलापुर, रत्नागिरी, नागपूर, नंदुरबार

रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.

ग्राहक सेवा क्र. : 18001024088, दूरध्वनी क्र. 022 - 68623005.

-मेल:- rgicl.maharashtraagri@relianceada.com

 आंबिया बहार सन 2021-22 मध्ये फळपिक निहाय योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत पुढील प्रमाणे आहे. शेतकऱ्यांनी (कर्जदार व बिगर कर्जदार) योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे, विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था /बँक/आपले सरकार सेवा केंद्र/ विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे/ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक पुढीलप्रमाणे आहे.

 

 

अ.क्र.

फळपिक

विमा संरक्षित रक्कम

गारपीट या हवामान धोक्याकरीता विमा संरक्षित रक्कम

शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग

घेण्याचा अंतिम दिनांक

1

द्राक्ष

320000

106667

दि. १5 ऑक्टोबर 2021

2

मोसंबी

80000

26667

दि. 31 ऑक्टोबर 2021

3

केळी

140000

46667

दि. 31 ऑक्टोबर 2021

4

पपई

35000

11667

दि. 31 ऑक्टोबर 2021

5

संत्रा

80000

26667

दि. 30 नोव्हेंबर 2021

6

काजू

100000

33333

दि. 30 नोव्हेंबर 2021

7

आंबा (कोकण)

140000

46667

दि. 30 नोव्हेंबर 2021

8

आंबा (इतर जिल्हे)

140000

46667

दि. 31 डिसेंबर 2021

9

डाळिंब

130000

43333

दि.14 जानेवारी 2022

10

स्ट्रॉबेरी

200000

66667

दि.14 ऑक्टोबर 2021

         

शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता जिल्हानिहाय वेगवेगळा असु शकतो.

आंबिया बहार सन 2021-22 या वर्षासाठी अधिसूचित फळ पिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी निश्चित करण्यात आला असून निर्धारीत केलेले हवामान धोके लागू झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा कंपनीमार्फत देय होणार आहे. आंबिया बहारातील फळपिकांची विमा नोंदणी करीता राष्ट्रीय पिक विमा पोर्टल (https://pmfby.gov.in) या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच आंबिया बहारात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांसाठी गारपीट या हवामान धोक्यासाठी राज्य शासनामार्फत विमा संरक्षण उपलब्ध करुन देण्यात आलेले असुन गारपीट या हवामान धोक्यासाठी सहभाग ऐच्छिक राहील व याकरीता अतिरिक्त विमा हप्ता देय आहे. ज्या शेतकऱ्यांना गारपीट या हवामान धोक्याकरिता सहभाग नोंदवावयाचा असेल अशा शेतकऱ्यांनी त्यांचा नियमीत व  अतिरिक्त विमा हप्ता हा बँकांमार्फतच भरणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोक्यांची तसेच त्यांना भरावयाच्या विमा हप्त्याची माहिती करुन घेऊन विहित मुदतीमध्ये नजिकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक / वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा. आंबिया बहारातील अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोके, विमा संरक्षित रक्कम, संरक्षण कालावधी, विमा हप्ता इत्यादी बाबतीत  सविस्तर माहितीचा दि. 18 जून 2021 चा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या https://www.maharashtra.gov.in कृषि विभागाच्या http://www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच ई - सेवा केंद्र व बँक स्तरावरही याबाबतची माहिती उपलब्ध करुन देण्याच्या सुचना कृषी विभागाने सहभागी विमा कंपन्यांना दिल्या आहेत.

सहभागी सर्व विमा कंपन्यांनी त्यांच्याकडील जिल्हा व तालुका स्तरावर नियुक्त केलेल्या प्रतिनिधींची नावे मोबाईल क्रमांकासह कृषि विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी सबंधित विमा कंपनीचे तालुका कार्यालय किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे

 

0-0-0-0-0-0

 

                          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.