मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

असंघटीत कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई-श्रम पोर्टलचे उद्घाटन नोंदणीकृत कामगारांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा हप्ता केंद्र शासन भरणार - निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव


          कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) :  केंद्र शासनाने विविध 300 व्यवसाय गटातील असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने असंघटीत कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस (NDUW) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 26 सप्टेंबरपासून असंघटीत कामगारांची नोंदणी करण्याकरीता ई-श्रम पोर्टल चे उद्घाटन करण्यात आले आहे. राष्ट्रीय डेटाबेसच्या आधारावर असंघटीत कामगारांकरीता सामाजिक सुरक्षा योजना अंमलात आणल्या जातील. सद्यस्थितीत NDUW अंतर्गत नोंदणीकृत कामगारांचे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे या वर्षाचे हप्ता रु. 12/- केंद्र शासनामार्फत भरला जाईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी कळविले आहे.

           यासाठी अटी व पात्रता याप्रमाणे .

1. नोंदणीकरीता पात्रता- 1) असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणारा वयवर्ष 16 ते 59 दरम्यानचा कामगार.2) आयकर भरणारा नसावा. 3) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचा सभासद नसावा. 4) असंघटीत कामगार शासनाने निश्चित केलेल्या 300 उद्योगातील असणे आवश्यक आहे.

2. आवश्यक कागदत्रे -1) आधार कार्ड, 2) बँक पासबूक (राष्ट्रीयकृत बॅंक अथवा IFSC कोड असलेली इतर कोणतीही बॅंक),  3) मोबाइल नंबर (OTB करीता स्वतःचा अथवा कुटुंबातील अन्य व्यक्तीचा ), 4) स्वयनोंदणी करण्यासाठी कामगाराचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे   आवश्यक.

3. नोंदणी कोठे करावी- 1) स्वतः, 2) नागरी सुविधा केंद्र (CSC), 3) कामगार सुविधा केंद्र

4) eSHRAM Portal URL : eshram.gov.in, 5) नॅशनल हेल्पलाइन नंबर 14434,         6) टोल फ्री नंबर 18001374150

 4. केंद्र शासनाचे कामगार व रोजगार मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार असंघटीत कामगारांची नोंदणीची कार्यपध्दती 1) नागरी सुविधा केंद्रामार्फत बॅक खात्याचा तपशिल, ई मेल आयडी, वारसाचा तपशील व सक्रीय मोबाईल नंबर याबाबतचा तपशिल अद्यावत केला जाईल. 2) कामगाराची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यास कामगारास नागरी सुविधा केंद्रातील (CSC) प्रतिनिधीकडून (VLE) A4 साईज पेपरवर कार्ड काढून देण्यात येईल. 3) कामगारांना नविन नोंदणी करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाहीत, परंतु कामगारास कोणतेही माहिती अद्यावत करावयची असल्यास रु.20/- नागरी सुविधा केंद्रातील (CSC) प्रतिनिधीकडून (VLE) आकारले जाईल.4) कामगारांची नोंदणी झाल्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा विना योजना (PMSBY) चे या वर्षाचे अंशदान रु. 12/-केंद्र शासनामार्फत अदा करण्यात येईल.

00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.