बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन

 


 

        कोल्हापूर, दि. 29 (जिमाका): सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय व सायबर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 1 ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ऑनलाईन  व्याख्यानमाला/वेबिनारचे आयोजन  दु. 2 ते 3.30 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेस अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांनी  सहभाग नोंदवावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त तथा जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीचे सदस्य सचिव विशाल लोंढे यांनी केले आहे.                                                                                           

जिल्हा विधी व सेवा  प्राधिकरणाचे  सचिव डॉ.पंकज देशपांडे यांचे व्याख्यान दु. 2  ते 2.45, Help Age India चे संस्थापक प्रकाश बोरगांवकर यांचे व्याख्यान दु. 2.45 ते 3.30 या वेळेत ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. व्याख्यान Google Meet या ऍ़पवर ऑनलाईन होणार असून त्याची लिंक - meet.google.com/pkj-stvm-itr अशी आहे.

व्याख्यानमालेमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार व त्यांच्या संबंधीच्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कोल्हापूर येथे दूरध्वनी क्र.0231-2651318 येथे संपर्क साधावा.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.