मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१

आंबेओहोळ मध्यम प्रकल्पाचे गुरुवारी लोकार्पण

 


 

कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय) : आंबेओहोळ  मध्यम प्रकल्पाचे गुरुवार दि. 9 सप्टेंबर रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते आंबेओहोळ प्रकल्प धरण स्थळ, मौजे उत्तूर, ता. आजरा येथे दुपारी 2 वाजता लोकार्पण व जलपूजन कार्यक्रम होणार आहे.

      या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ तर पालकमंत्री सतेज पाटील, जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल पाटील यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

 तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदार, पदाधिकारी व पाटबंधारे‍ विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत, असे कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी कळविले आहे.

0000000

 

 

           

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.