गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१

अल्पसंख्यांक ऑनलाईन जॉब फेअरचे आयोजन

 


 

      कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने दि. 23 व 24 सप्टेंबर रोजी अल्पसंख्यांक ऑनलाईन जॉब फेअरचे आयोजन केले आहे. इच्छुक युवक-युवतींनी  दि. 24 सप्टेंबर पर्यंत आपले पसंतीक्रम नोंदवून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स ऑफिसर, विमा प्रतिनिधी, सीएनसी, व्हिएमसी ऑपरेटर, मशिन शॉप सुपरवायझर, स्टोर असिस्टंट, इन्शुरंन्स ॲडवायझर, ॲडवायझर, टेलीको-ऑर्डीनेटर अशी 10 वी ते पदवीधर, पदव्युत्तर, डिप्लोमा, बीई, आयटीआय या शैक्षणिक पात्रतेची  जिल्ह्यातील नामांकित 7 आस्थापनांनी 151 पेक्षा जास्त रिक्तपदांद्वारे मोठी संधी  देऊ केली आहे.

           हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी आपल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे या विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर लॉगीन करुनûआपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्त पदासाठी आपला पसंतीक्रमò व इच्छुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावी

          इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार 24 सप्टेंबर रोजी त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएसव्दारे अथवा दूरध्वनीव्दारे उद्योजकांकडून कळविण्यात येईल. शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीचे आयोजन करण्यात येईल. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्र. 0231-2545677 वर संपर्क साधावा.

000000

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.