कोल्हापूर, दि.
24 (जिल्हा माहिती कार्यालय): १ ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त
जिल्ह्यातील एकही लस न घेतलेल्या आणि पहिला डोस घेवून 84 दिवस पूर्ण झालेल्या ६०
वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कोविड लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात
आले आहे. या दिवशी जिल्ह्यातील सर्वच कोवीड लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांचे
प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या प्रति आदर व्यक्त करणे, त्यांनी कुटुंबासाठी,
समाजासाठी दिलेल्या योगदाना प्रति आदर, कृतज्ञता व्यक्त करणे, वृध्दांबरोबर होणारे
गैरवर्तन आणि अन्यायाला रोखण्यासाठी १४ डिसेंबर १९९० पासून दर वर्षी १ ऑक्टोबर हा
'जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.
जिल्ह्यात ६० वर्षावरील ५ लाख ६९ हजार २९५ इतके
अपेक्षित लाभार्थी आहेत. पहिल्या लसीची मात्रा घेतलेले लाभार्थी ८२ टक्के व दुसऱ्या लसीची मात्रा
घेतलेले लाभार्थी ६० टक्के इतके आहेत. जिल्ह्यात कोविड लसीचा
अद्याप एकही डोस न झालेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या ६९ हजार २६३ इतकी आहे. जागतिक ज्येष्ठ
नागरीक दिनाचे औचित्य साधून तालुका निहाय कोवीड लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले
आहे.
तालुका निहाय एकही डोस न झालेल्या ज्येष्ठ
नागरिकांची संख्या पुढील प्रमाणे
आजरा 1206,
भुदरगड 2495, चंदगड 5780, गडहिंग्लज 3115, गगनबावडा 579, हातकणगंले 22233, कागल
2914, करवीर 8202, पन्हाळा 3705, राधानगरी 3872, शाहुवाडी 135, शिरोळ 7653, कोल्हापूर म.न.पा. 7374 असे एकुण 69,263 नागरिकांचे लसीकरण करण्यात
येणार आहे.
कोवीड लसीकरण न झालेल्या सर्व
जेष्ठ नागरिकांनी 1 ऑक्टोबर 2021 रोजी आपले लसीकरण करुन घ्यावे, असे अवाहन जिल्हा
प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.