इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, १ मार्च, २०१२

कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचा कोल्हापूर दौरा कार्यक्रम

       कोल्हापूर दि. १ : राज्याचे कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांचा दि. १ मार्च २०१२ पासूनचा कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      गुरुवार दि. १ मार्च २०१२ रोजी सायं. ६ वाजता पुण्याहून शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे येत असून सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण व मुक्काम.
      शुक्रवार दि. २ मार्च रोजी सकाळी ७-३० ते १०-३० पर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ११ ते दुपारी १ पर्यंत राजेंद्ग माने, सांगाव यांच्यासमवेत राखीव. १ ते ५-३० पर्यंत शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे राखीव. सायं. ६ वाजता दावणे गल्ली, कागल येथे रेणुका मंदिर जिर्णोध्दार व कलशारोहण कार्यक्रमास उपस्थिती. रात्रौ ८ वाजता कागल येथे शिवाजी भगले यांच्याकडे राखीव.
      शनिवार दि. ३ मार्च रोजी सकाळी ७-३० ते १० पर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. १० वाजता कागलहून मोटारीने गडहिंग्लजकडे प्रयाण. ११ ते दुपारी २ पर्यंत राष्ट्रवादी कार्यालय गडहिंग्लज येथे गाठीभेटी. २ वाजता गडहिंग्लजहून कोल्हापूरकडे प्रयाण. ३ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. ४ वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ शिष्यवृत्ती धनादेश वितरण कार्यक्रमास उपस्थिती. ५ वाजता कोल्हापूर येथे श्री. नविद यांचेसमवेत चर्चा. सायं. ५-३० वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण व मुक्काम.
      रविवार दि. ४ मार्च रोजी सकाळी ७-३० ते १०-३० पर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ११ वाजता शासकीय विश्रामगृह, कागल येथे कागल तालुका शिक्षक पत संस्था संदर्भात बैठक. दुपारी १२ वाजता एकोंडी येथे चर्मकार समाज मेळाव्यास उपस्थिती. २ वाजता एकोंडीहून कोल्हापूरकडे प्रयाण. २-३० वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. ४ वाजता मानेमळा रेल्वे लाईन कागल पहाणी करणे व नागरीकांसमवेत चर्चा व कागलमधील विकास कामांची पाहणी. सोयीनुसार मेतके येथे संतसद्‌गुरु बाळू मामा येथील आयोजित महाप्रसादास उपस्थिती. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण व मुक्काम.
      सोमवार दि. ५ मार्च रोजी सकाळी ७-३० ते ११ पर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ११ वाजता कोल्हापूरकडे प्रयाण. ११-३० वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. दुपारी १ वाजता कोल्हापूरहून गडहिंग्लजकडे प्रयाण. २ वाजता गडहिंग्लज येथे आगमन व गडहिंग्लज तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा मेळावा. ४ वाजता गडहिंग्लहून कोल्हापूरकडे प्रयाण. सायं. ५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आगमन व १)चांदोली अभयारण्य पुनर्वसन, गलगले, ता. कागल, २) कागल नगरपालिका घरकुल जागा मिळणेसंदर्भात व ३) विशेष घटक मागासवर्गीय घरकुल या विषयाबाबत जिल्हाधिकारी व इतर अधिकार्‍यांसमवेत बैठक. ६ ते रात्रौ ८ पर्यंत मधुसूदन हॉल, हॉटेल पॅव्हेलियन, बसंत-बहार टॉकीज रोड, कोल्हापूर येथे दै. पुण्यनगरी, कोल्हापूर आवृत्तीच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहभोजनाच्या कार्यक्रमास उपस्थिती. रात्रौ. ८-३० वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.