कोल्हापूर दि. ३ : त्रिपुराचे राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील रविवार दि. ४ मार्च २०१२ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून त्यांच्या दौर्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि. ४ मार्च २०१२ रोजी सकाळी ७-२० वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे आगमन व निपाणी, जि. बेळगांवकडे प्रयाण. ११ वाजता निपाणी येथे दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन कार्यक्रमास उपस्थिती. सायं. ७ नंतर कोल्हापूर येथे आगमन व प्रसाद मंगल कार्यालय येथे दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव यांच्या कार्यक्रमास उपस्थिती. रात्रौ कसबा बावडा येथे मुक्काम.
सोमवार दि. ५ मार्च २०१२ रोजी विलासराव वायदंडे यांनी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थिती.
मंगळवार दि. ६ मार्च २०१२ रोजी रात्रौ ८-३० वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.