इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, १३ मार्च, २०१२

स्थानिक स्वराज्य संस्थेतील महिला सदस्यांकरिता गुरुवारी क्रांतीज्योती प्रशिक्षणांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा

कोल्हापूर दि. १३ : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य व कोल्हापूर जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती प्रशिक्षणांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेतील महिला सदस्यांकरिता प्रशिक्षण व जिल्हास्तरीय कार्यशाळा दि. १५ मार्च २०१२ रोजी सकाळी १० ते सायं. ५-३० वाजेपर्यंत श्री. शाहू सांस्कृतिक भवन, मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
      महाराष्ट्र  राज्याच्या  राज्य  निवडणूक आयुक्त  नीला सत्यनारायण  यांच्या  हस्ते  सकाळी १०-५० वाजता कार्यशाळेचे उद्‌घाटन होणार आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर कादंबरी कवाळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. यशोदा कोळी, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, महानगरपालिकेच्या आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी-प्रसन्ना यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळा संपन्न होत आहे.
      कार्यशाळेस माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार श्रीमती संजिवनीदेवी गायकवाड, सौ. साहेरा हसन मुश्रीफ, सौ. प्रतिमा सतेज पाटील, सौ. संध्यादेवी बाबासाहेब कुपेकर, सौ. संगिता राजू शेट्टी, सौ. कृष्णाबाई सा. पाटील, सौ. शुभलक्ष्मी विनय कोरे, सौ. मायादेवी कृष्णराव पाटील, सौ. राजलक्ष्मी चंद्गदिप नरके, सौ. मंगल महादेवराव महाडिक, सौ. भारती सुरेश हाळवणकर, सौ. अंजनी चंद्गकांत पाटील, सौ. वैशाली राजेश क्षीरसागर, सौ. लेखा सुजित मिणचेकर, सौ. सुमन भगवान साळुंखे, सौ. नंदाताई पोळ व सौ. पुष्पमाला मोहनराव जाधव यांची उपस्थिती लाभणार आहे, असे संयोजकातर्फे कळविण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.