कोल्हापूर दि. ३ : येथील कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या वसतीगृहाचे भूमिपूजन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थी व विद्यार्थीनींशी संवाद साधला.
यावेळी परीक्षा भवन इमारत विस्तारीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरीचे कुलगुरु डॉ. तुकाराम मोरे, अधिष्ठाता डॉ. हरि मोरे, सहअधिष्ठाता डॉ. अशोकराव फरांदे, अभियंता मिलींद ढोके, विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थींनी यावेळी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.