कोल्हापूर दि. २ : शौयपदक धारक तसेच माजी सैनिक/विधवा यांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यासाठी तसेच माजी सैनिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरात मार्च महिन्याच्या दुसर्या आठवड्यात माजी सैनिक मेळावा आयोजित करावयाचा आहे.
माजी सैनिक मेळाव्याच्या आयोजनाबाबत तसेच अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात ७ मार्च २०१२ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील माजी सैनिक संघटना पदाधिकार्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व माजी सैनिक संघटनांचे अध्यक्ष व उपाध्यक्षांनी बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल सुहास नाईक यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.