कोल्हापूर दि. १४ : जागतिक ग्राहक दिनानिमित्त उद्या १५ मार्च २०१२ रोजी कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जिल्हा ग्राहक मंचचे प्रशांत बुरांडे आणि संजय हुकेरी यांचे ग्राहकांचे हक्क, कायदे आणि जबाबदारी याबाबत व्याख्यान होणार आहे.
हा कार्यक्रम शाहू स्मारक भवन येथे उद्या सकाळी अकरा वाजता होईल. जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे, सहाय्यक पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, शहर पुरवठा अधिकारी शिल्पा ठोकडे यांनी या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.